आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मळवली ते देवले , डोंगरगाववाडी रस्त्याची खड्डे पडल्याने चाळण.

रस्त्याची खड्डे पडून त्यात पाणी साचून चाळण झाली असून नागरिकांकडून ,असंख्य वाहनचालकांकडून रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली आहे.

Spread the love

 सामाजिक : मळवली ते देवले , डोंगरगाववाडी रस्त्याची खड्डे पडल्याने चाळण.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता.६ प्रतिनिधी.

मळवली ते देवले , डोंगरगाववाडी रस्त्याची खड्डे पडल्याने चाळण झाली असून या मार्गाने जाणाऱ्या औंढेखुर्द , औंढोली येथील वाहनचालकांनाही ञास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची खड्डे पडून त्यात पाणी साचून चाळण झाली असून नागरिकांकडून ,असंख्य वाहनचालकांकडून रस्ता दुरूस्तीची मागणी करण्यात आली आहे.

लोणावळा पवनाधरणाकडे जा ये करण्यासाठी मळवलीच्या रेल्वेस्टेशन वरून जास्त वर्दळ असते..
शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी , कामगार तसेच ग्रामस्थ महिलावर्ग बाजारासाठी मळवलीच्या स्टेशनला रोज जा ये करतात…

या स्टेशनला लोकांना खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागतो..त्यामुळे तातडीने रस्ता दुरूस्त करावा व वाहनचालकांना सुखकर होईल , असा रस्ता करावा , अशी मागणी वाहनचालक , ग्रामस्थ करीत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!