महाराष्ट्रसामाजिक

श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने, तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत सर्व  धार्मिक विधीसमावेत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत सर्व  धार्मिक विधीसमावेत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.On behalf of the Shri Ram Janmotsav Committee, the Shri Ram Janmotsav was concluded with enthusiasm in the historic Shri Ram temple here in the presence of the descendants of Sarsenapati Dabhade family and devotees.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २ मार्च.

तळेगाव दाभाडे, येथील दाभाडेआळी मध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा श्री व सौ श्रध्दा संग्राम दाभाडे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर श्रीराम जन्मोत्सावाची कीर्तनरुपी सेवा ह.भ.प जगताप महाराज यांनी केली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन  दत्तात्रय कोंडीबा दाभाडे सह परिवाराने केले.

यावेळी सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज माजी नगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे,श्रीमंत याज्ञीसेनीराजे दाभाडे,श्रीमंत सत्यशिलराजे दाभाडे, श्रीमंत वृषालीराजे दाभाडे,श्रीमंत दिव्यालेखाराजे दाभाडे,आमदार सुनील शेळके, सारिका शेळके, माजी नगराध्यक्ष अँड रवींद्र दाभाडे, समितीचे अध्यक्ष तुषार सावंत व सहकारी,संतोष दाभाडे ,साहेबराव दाभाडे,आण्णासाहेब दाभाडे,रवींद्र माने,सुबोध दाभाडे, अशोक दाभाडे आदी मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.

  1. ’ श्रीराम जन्माचे प्रसंगी आरती,जन्माचा पाळणा उपस्थित महिलांनी गायला. तर कार्यक्रमाचे नियोजन अक्षय दाभाडे,रुपेश गायकवाड, प्रशांत दाभाडे गौरव तापकीर, स्वप्नील दाभाडे व सहका-यांनी केले. सूत्रसंचलन अशोक दाभाडे यांनी केले.

सायंकाळी श्रीराम मंदिरापासून श्रीरामाची पालखी ग्रामप्रदाक्षीणेसाठी निघाली. तिच्यापुढे भजन, दिंडी, बँड, ढोललेझीम,मल्लखांब आदी वाद्यासह सजीव राम, सीता, लक्ष्मण यांचा देखावा सादर केला होता.जागोजागी रांगोळी काढून,पुष्पवृष्टी करून महिलांनी,नागरिकांनी स्वागत केले.
फोटो ओळ – श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी उपस्थित सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!