आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती व मातृत्व दिवस यांचे औचित्य साधून आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला..

इलेक्ट्रॉनिक सदन, एम.आय.डी.सी. भोसरी येथुन सुनियोजित वेळेत स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या जयघोषाने कार्यक्रम सुरुवात करण्यात आली होती.

Spread the love

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती व मातृत्व दिवस यांचे औचित्य साधून आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे यांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला..On the occasion of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Raje Jayanti and Mother’s Day, Aapa Parivar Social Foundation Pune conducted a cleanliness campaign.

आवाज न्यूज :चिंचवड प्रतिनिधी १६ मे.

आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आणि मातृत्व दिवस यांचे अवचित्य साधून,आपला परिवार व पिंपरी/चिंचवड म.न.पा. यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता अभियान-२०२३” कार्यक्रम आयोजित करण्यात आला इलेक्ट्रॉनिक सदन, एम.आय.डी.सी. भोसरी येथुन सुनियोजित वेळेत स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या जयघोषाने कार्यक्रम सुरुवात करण्यात आली होती.

या अभियानात समविचारी समाजाप्रती, पर्यावरणाप्रती असलेली तळमळ असणाऱ्या एस.पीज हास्ययोग परिवार, पिंपळे गुरव, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, नवचैतन्य हास्ययोग परिवार, सितांगण उद्यान, कासारवाडी, जुन्नर तालुका मित्र मंडळ, पुणे रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, प्रेमसागर हौसिंग, सोसायटी, अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड, उदय ग्लोरिअस पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, अजिंक्य सोशल फाउंडेशन, आई गार्डन ग्रुप दापोडी, नवचैतन्य हास्य योग परिवार दापोडी, मौलाना आझाद सोशल फाउंडेशन, च-होली बुद्रुक, गाबित विकास मंडळ, सिल्व्हर सिटी को-ऑप हाऊसिंग सोसायटी जाधववाडी-चिखली, संमित्र विकास मंडळ, (कोकण), कोकण मराठा संघ, पुणे, त्रिदल माजी सैनिक सेवा संघ खडकवासला पुणे, नेचर डिलाईट फाऊंडेशन,पुणे, पर्यावरण संवर्धन समिती,पुणे, नवचैतन्य हास्य परिवार डायनोसोर गार्डन गुरव पिंपळे, मैत्री भुषण (एलएलपी) सोसायटी, पुणे. भारतीय बौद्धजन विकस समिती, पिंपरी चिंचवड, रमेशदादा बागवे प्रतिष्ठान, सांगवी, श्री दत्ता दिगंबर ट्रान्स अँड लॉजिस्टिक्स, पुणे, संत तुकाराम भजनी मंडळ जयमालानगर, सांगवी हिंदू खाटीक चॉरेटबल ट्रस्ट, पिंपरी चिंचवड, उत्सव होम सोसायटी जेष्ठ नागरिक संघ, भोसरी संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 450 पेक्षा अधिक सदस्यांनी सकाळी साडेसहा वाजता सुनियोजित वेळेत स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग घेऊन दोन कि.मी. परिसर कचरा, प्लास्टिक उचलून साफ सफाई करत स्वच्छ केला.

आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत स्वच्छता अभियान “सहभाग गौरव पत्र” व गुलाब पुष्प क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे, भारत स्वच्छ अभियान समन्वयक सोनम देशमुख आणि आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते सहभागी संस्थांना देवून गौरविण्यात आले.सर्व उपस्थिती सदस्यांनी दरम्यानच्या काळात स्वच्छता व पर्यावरणाची शपथ घेतली. क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की, मातृदिनाचे औचित्य साधुन मातृतुल्य अशा वसुंधरेची काळजी आपण सर्वानी घेतली पाहीजे. रस्त्यावर थुंकने अर्थात लाल पिचकारी मारुन रंग रंगोटी करु नये. प्लास्टिक कचरा निर्मुलन स्वच्छतेची असणारी प्रत्येकाची जबाबदारी आणि आपल्या संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव त्यानी केला. आपल्या शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी एकत्र येऊन पर्यावरण, वसुंधरेसाठी काम करण्याचा विचार सर्व संस्थांच्या सदस्य, अध्यक्षांनी मांडला.

अभियान दरम्यान ठिकाणी असलेल्या दगडांवर वैशिष्ट्य पुर्ण रंगरंगोटी करुन आकर्षक सुशोभीकरण करण्यात आली.आज स्वच्छता करता करता खालील घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्वच्छता विषयी घोषणा देत समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी मनापासून केला. “घर घर नारा, स्वच्छ देश हमारा” आमचे शहर, स्वच्छ शहर, हरित शहर, आपली जबाबदारी…प्लास्टिक मुक्त भारत देश हमारा…. हा नारा दिला.आपला परिवार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एस.आर.शिंदे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मकरसंक्रांत आणि एक हात मदतीचा हे चार उपक्रम राबवले जातात.स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी जवळजवळ एक लाख लोकांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. प्लास्टिक मुक्त भारत देश माझा ही चळवळ उभी राहिली. हा संदेश संसदेपर्यंत पोहचविण्यात फाउंडेशनला यश मिळाले.

वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपला परिवाच्या स्वच्छता कमिटी अभय गादिया, नवनाथ नलावडे, सचिन गावडे, महमंदशरीफ मुलाणी, पराग खाडिलकर, राजू खांदवे, रुपेश गुंड, राजेश देशमुख आणि शहाजी जगदाळे यांनी परिश्रम घेतले. सुदंर नियोजन केले. उपस्थित सर्व संस्थांचे आभार कमिटी मेंबर नवनाथ नलावडे यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!