ताज्या घडामोडी

पोस्टमास्टर जनरल सदिच्छा भेट

Spread the love

पश्चिम बंगाल राज्यातील कलकता शहरात पोस्टमास्टर जनरल पदावर कार्यरत असणारे श्री अमिताभ सिंह यांची मुंबई पोस्टमास्टर जनरल या पदावर नियुक्ती करण्यात आली. मुंबई विभागीय मुख्यालयात सेवेत रुजू झाल्यावर व्हिजन एज्युकेशन डेडीकेशन फाऊंडेशन संस्था द्वारा त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी पोस्टमन विशेषतः महिला कर्मचारी वर्गास अधिक सोयी उपलब्ध करून देणे बाबत सविस्तर चर्चा झाली. भारतीय टपाल खाते ज्येष्ठ तथा वयस्कर नागरिकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत असून भविष्यात पोस्टमन कर्मचाऱ्यास इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती श्री अमिताभ सिंह यांनी यावेळेस दिली. व्हिजन एज्युकेशन डेडीकेशन फाऊंडेशन संस्था अध्यक्ष श्री स्वप्निल राणी नंदकुमार तथा ज्येष्ठ सल्लागार श्री मंगेश रासम यावेळेस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!