ताज्या घडामोडी

तरुणाईला निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचे आवाहन

Spread the love

सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स महाराष्ट्र राज्य, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य , व आयुषमान प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने व्हँलेंटाईन डे निमित्त

” नको मला बंगला गाडी, शोधेनं मी व्यसनमुक्त सोबती”

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२२
नरिमन पाँईंट येथे जोडीदार मज निर्व्यसनीच हवा या संदेशाचे घोड्यावर स्वार महाराष्ट्राच्या लेकींनी वरात काढुन व्यसनमुक्तीचा प्रचार केला. यांत मुंबईतील व्यसनमुक्तीपर कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स , आयुषमान प्रतिष्ठान मुंबई संस्थांचे प्रतिनिधी व नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे थोड्या वेळाची करमणूक असते. मानवी जिवनाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रेम. मनाचा व शरिराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम. हेच बंध अडीअडचणीत दुःखात आधार ठरतात. व्यसने आधारापोटी कवठाळली जातात परंतु व्यसने ही आधार नाहीत हे समजुन घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार आपणांस ढासळताना दिसत असतो.
व्यसनाधिनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स , नशाबंदी मंडळ ,आयुषमान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले होते. वरील संदेश एकाच वेळी देण्याच्या उद्देशाने मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात प्रेम करा मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा हा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरुन देत असल्याची माहिती देत हा व्यसनमुक्तीचा लढा यापुढे अखंडपणे चालु राहील असे सांगत व्यसनमुक्त जीवनच सुखसमृध्द बनवु शकते म्हणुन निर्व्यसनी आयुष्याची कास धरली पाहिजे असे मत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष अॅड विक्रांत वाघचौरे यांनी सांगितले.
याप्रसंगी नशाबंदी मंडळाने अभिनेते सिध्दार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्निल जोशी, दिलीप प्रभावळकर, देवदत्त नागे, जयवंत भालेकर आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या प्रेमाच्या विचारांचे व्यसनमुक्तीपर प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. ज्यात निर्व्यसनी जोडीदाराच्या आवश्यकतेचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच उपस्थित तरुण तरुणींना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यामध्ये सिध्दार्थ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि 100 मुंबईतील उपस्थित युवकांनी संकल्प केला *”मला नको बंगला गाडी, शोधेन मी व्यसनमुक्त गडी”* हा संकल्प केला.
किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रिचा परवाना रद्द करावा यासाठी महाराष्ट्राच्या लेकी आज जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य महिला आयोग यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या मुंबई सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला मा.श्री समाधान इंगळे साहेब उपायुक्त समाज कल्याण विभाग मुंबई, आयुषमान प्रतिष्ठान मुंबईच्या सरचिटणीस सौ सुप्रियाताई लांडगे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी संस्थापक अध्यक्ष आयुषमान प्रतिष्ठाण मुंबई श्री अशोक लांडगे , महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री विवेक साळवी उपस्थित होते
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री बसवराजजी शिंदे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष मा श्री भारत चवरे , राष्ट्रीय सरचिटणीस गणेश वाघचौरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन पाटील, मुंबई विभाग लीगल एड प्रमुख अॅड.अभय सोडिये, नितीन सोनवणे अध्यक्ष पोलीस ग्रीवीयंन्स सेल महाराष्ट्र राज्य ,जब्बार शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र राज्य ,श्री नागनाथ धोत्रे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री डॉ स्वप्नील माने अध्यक्ष डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!