क्रीडा व मनोरंजन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण- शिवरूद्र प्रतिष्ठान

Spread the love

पुणे- लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा ऑक्सिजन पॉईट क्र ३ या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरूद्र प्रतिष्ठान च्या वतीने १०१ जंगली वृक्ष लावून वृक्षारोपण केले .
संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजी राजेंवर अपार प्रेम होते. नशीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!