ताज्या घडामोडी

धनगर समाजाचा १५ वा राज्यस्तरीय वधूवर मेळावा संपन्न.

Spread the love

भारत कवितके,मुंबई कांदिवली.
रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी पुणे नवी सांगवी,येथील रामकृष्ण मंगल कार्यालय,पिंपळे गुरव,शिवदत्त नगर या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत धनगर समाज सेवा संघ पुणे व्दारा आयोजीत करण्यांत आला होता.धनगर समाजातील इच्छुक वधूवर पालक,संघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व पत्रकार मोठ्या प्रमाणात या मेळाव्यास उपस्थीत होते.मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलीत करुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला.मान्यवरांचे हस्ते व्यासपिठावर मल्हाराव होळकर यांच्या प्रतिमेचे प्रकाशन करण्यांत आले.तसेच वधूवर स्मरणिकेचे ही प्रकाशन करण्यांत आले. या वेळी प्रा.राम शिंदे यांनी सांगितले की, ” धनगर समाज सेवा संघामार्फत समाज सेवा कार्याच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची संधी लाभली आहे. त्याचा आपण फक्त लग्न जमविण्या पुरताच उपयोग करु नये.समाजाप्रती आपले दायित्व सिध्द करण्याची संधी आहे. ” तर दत्तात्रेय मामा भरणे यांनी यावेळी सांगितले की, ” धनगर समाज सेवा संघामुळे तुम्हाला समाज सेवेची संधी मिळत आहे. हसत खेळत ताण तणावामध्ये न राहता या मध्ये सामील व्हा.मेळाव्यास सर्वांनी आनंदाने या व आनंदाने जा.सध्या धनगर समाजात वेगवेगळे वधूवर मेळावे आयोजीत करण्यांत येत आहे. सोलापूर,बारामती,पुणे,मुंबई अशा ठिकाणी विविध मेळावे घेतले जातात.समाज सेवा करा.पोटजाती विसरुन मुलामुलींची लग्ने जमवा.” धनगर समाजाचे विचारवंत व इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.यशपाल भिंगे सर म्हणाले,” आपलेच काही सुशिक्षित लोक आपल्याच समाजाच्या इतिहासाकडे पाहत नाहीत.सुशिक्षित वर्ग अजूनही समाजाबद्दल बोलत नसतो.माझ्या आतापर्यंतच्या यशामागे,प्रगतीमागे माझ्या समाजाचा सहभाग असल्याचे कबूल करतो.समाजाची प्रगती करायची असेल तर आपल्या समाजाचा इतिहास पाहिला पाहिजे,वाचला पाहिजे.अशा कार्यक्रमामधूनच समाज हिताच्या होत असतात.व त्या निमित्याने समाजहित जपावे.” वधूवर मेळाव्याचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी केले.यावेळी धनगर समाज सेवा संघाच्या महाराष्ट्रा तील जिल्हा अध्यक्ष, संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पत्रकार यांचे सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तर मुंबई कांदिवली येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक भारत कवितके यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या मेळाव्यास प्रसंगी प्रा.राम शिंदे,दत्तात्रेय मामा भरणे,मुकुंदराव कुचेकर,उज्वला हाके,महेश लेंडे,रेखाताई देवकते,अजित लकडे,जयवंत कवितके,अनिल धायगुडे,कैलासभाऊ थोपटे,राजेंद राजापुरे,दत्ता म्हेत्रे,बाळासाहेब वाघमोडे, रविंद्र कोकाटे,प्रतिभाताई धानापुणे,गोविंदराव वलेकर,आदि मान्यवर उपस्थीत होते. दुपारी जेवणानंतर वधूवरांच्या पालकांच्या एकमेकाशी ओळखी वाढत जाऊन लग्न जमविण्या बाबत सकारात्मक चर्चा घडून येत होत्या.दोन अन्नदाताचेही यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!