ताज्या घडामोडी

समतोल नवदुर्गा भाग ~5

Spread the love

अन्नदाता सुखी भव असे आपण कधी म्हणतो
आपल्याला माहिती आहे आईचा जागर करताना सुखी संसाराची प्रार्थना केली जाते हा संसार म्हणजे समाजाचा आहे समतोल कार्य हे कोणत्या एका व्यक्ती चे नाही तर ते समाजाचे आहे *समतोल मधील या दुर्गा समाजातील बांधवांना सुखासाठी कार्य करीत आहेत म्हणून त्या दुर्गा आहेत अशाच एका दुर्गेचा आज परीचय होणार आहे*
*महिला ही आदीमाया शक्ती म्हणून ओळखली जाते जेवढी ती प्रेम करणारी आहे तेवढीच ती चंडिका सुद्धा आहे असे म्हणतात जर तिने ठरवले तर संसार सुखाचा करेल आणि ठरवले तर संसार उठवेल सुद्धा*…
*उत्तर प्रदेश मधून आलेली रिंकु यादव ही समतोल मधील* *अन्नपूर्णा म्हणून ओळखली जाते* सुरवातीला समतोल मध्ये किमान तीन महिने जरी काम केले तरी खूप हिम्मत आहे अशी परीक्षा होत राहते कारण समतोल च्या कामात चसुत्री अंगीकृत केल्याशिवाय टिकत नाही सर्व समान म्हणजे समता स्विकारली पाहिजे म म्हणजे ममता कामाबद्दल प्रेम पाहिजे फक्त ड्यूटी करून चालत नाही तो म्हणजे तोहफा देण्यासाठी सक्षमीकरण झाले पाहिजे आणि ल म्हणजे लक्ष्य याचा अर्थ या कार्याचा पल्ला दुरवर गाठण्यासाठी तुमचे एक लक्ष्य ठरले पाहिजे अर्थात हे सर्व करताना तुम्हाला समतोल साधणे महत्त्वाचे आहे म्हणून समतोल मध्ये फक्त काम केले जात नाही तर कार्यकर्ते यांची परिक्षा होते म्हणून त्या दुर्गे प्रमाणे बनत जातात ठाणे स्टेशन ते दादोजी कोंडदेव स्टेडियम म्हणजे फक्त 10 मिनिटाचे अंतर आहे एवढे अंतर सुद्धा सुरवातीला चुकणारी ही रिंकु आज ठाण्यातील गल्ली ना गल्ली ओळखते घरातील संस्कार किंवा परंपरा म्हणा पुरूषाने कमवुन आणायचे आणि महिलेने फक्त घर संभाळायचे हे आता खूप बदलले आहे आता तर महिलेने कमवायचे आणि पुरूषाने घरी बघायचे अशी परीस्थिती वाढत चालली आहे बोरीवली इथे फळांचा धंदा जोरात सुरु होता घरातील लोकांनी मुंबई मध्ये राहुन हातभार लावण्यासाठी रिंकु ला नवरा सोबत मुंबई मध्ये पाठवले सुरुवातीला सुखाचा संसार सुरू होता पैसाची आवक चांगली होती त्यामुळे मागे पुढे विचार न करता पाच मुले झाली एकत्र कुटुंब असल्याने जास्त भार संभाळण्याचा वाटत नव्हता हळूहळू मुले मोठी होत होती तर इकडे नवरा रोज दारू पिऊन घरात येऊ लागला होता भांडण सुरू व्हायला लागली होती आर्थिक नियोजन बिघडु लागले होते आता परीस्थिती समजण्या पलीकडे गेली होती घरातील सर्व लोकांनी दारू सोडावी म्हणून प्रयत्न केले परंतु काही फरक पडत नव्हता शेवटी नवरा सोडून जावे लागेल अशी स्थिती आली होती भावाकडे विनंती केली आणि 5 मुले आणि रिंकु यांचा नवीन प्रवास सुरु झाला बोरीवली वरून कल्याण आणि कल्याण वरून दिवा असे घर बदलत स्थान निश्चित दिव्यात झाले मुलांचा संभाळ करायचा होताच त्यामुळे काही तरी काम करावे लागणार होते सुरवातीला कडिया काम म्हणजे बिल्डिंग बांधकाम तेथे बिगारी काम केले पण मुले लहान असल्याने खाणापिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होऊ लागली नंतर एकमेकांच्या ओळखीने भाजीपाला विकण्याचा धंदा सुरू झाला आता थोडी आर्थिक घडी बसत होती इकडे समतोल च्या कामाचा विस्तार वाढतच चालला होता प्रामाणिक व कष्ट करण्याची तयारी असलेली माणसे शोधून त्याला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात होते आमच्या लता वानखेडे च्या संपर्कात स्टेशनवर काम करणाऱ्या अनेक संस्था चे कार्यकर्ते संपर्कात होतेच अशा *एका राजु नावाच्या व्यक्ती बरोबर स्वयंपाक करण्यासाठी कोणी महिला आहे का म्हणून चर्चा सुरू झाली त्याने रिंकु यादव बद्दल माहिती दिली आणि अजून एका देवीचा समतोल मध्ये प्रवेश झाला* सुरवातीला भांडी घासून धुवून ठेवण्याचे काम रिंकु करीत होती हळूहळू स्वयंपाक करताना घाबरत होती गँस पेटवताना म्हणजे मोठ्या शेगड्या पेटवताना हिम्मत होत नव्हती शिकावे लागणार होतेच त्यामुळे हिम्मत करून जेवण बनवायला सुरुवात झाली आणि अन्नपूर्णा पदवीच घेऊन टाकली
*समतोल फांऊंडेशन मध्ये अन्नछत्र हे एक स्वतंत्र युनिट तयार झाले आहे 2018 मध्ये दसरा च्या शुभमुहूर्तावर* *शल्यचिकित्सक कैलास पवार व समतोल चे अध्यक्ष संजयजी केळकर हरीहरण सर व मी स्वतः याची सुरुवात सिव्हिल हाँस्पिटल मध्ये केली सुरवातीला 50 गरजुंना अन्नदान होत होते* *हळूहळू हाच आकडा 150/200 प्रतिदिन होत गेला कोविड महामारी मध्ये हाच आकडा 1 लाखाच्या आसपास गेला जेवण बनविणे हा विषय किती अवघड आहे याची प्रचीती आपण रोजच घरी घेत असतो आजच्या स्थिती मध्ये महिन्यात 6000 पेक्षा अधिक लोकांना अन्नदान होत आहे* ठाणे मधील तलाव पाळी, स्टेशन रोड ,सेंट्रल मैदान आणि इतर ठिकाणी हे निराधार लोकांना दिले जाते परंतु यासाठी सर्वेक्षण केले जाते प्रोफाइल बनवली जाते नंतर समतोल मित्र ओळखपत्र देऊन त्याच व्यक्ती ला अन्नदान होते हे सर्व करताना रिंकु यादव यांनी घरातील समस्या कधीही मध्ये येऊ दिली नाही घरातील एक मुलगी नेहमीच आजारी असताना कधीही त्याबाबत अडचण आहे असे म्हटले नाही खर तर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर *खरोखरच दैवी शक्ती असणारे हे लोक आहेत असे जाणवते रोजच्या रोज जेवण बनविताना तीच चव तेच नियोजन तोच उत्साह टिकून ठेवणे खूप अवघड असते पण रिंकु यादव यामध्ये ही कला उपजत आहे किती त्रास झाला तरी चेहऱ्यावर हसू असले पाहिजे तरच समोरून आलेला गरजवंत आनंदी होतो असे ती आवर्जून सांगते त्यामुळे तीच्या ओठावरील लाली व चेहऱ्यावर असणारे हसू खूप एनर्जी भासवते आज 5 वर्षे झाली हा प्रवास सातत्याने सुरू आहे देवीची उपासना करतांना नाच ,गाणी आनंदाने करून माझ्या हातून जे काम होत आहे त्यामध्ये खंड पडू नये म्हणून ती प्रत्येक नवरात्र मध्ये घटस्थापना करते उपवास करते स्वतः बरोबर समाजातील कोणताही व्यक्ती उपाशीपोटी राहु नये म्हणून याचना करते आणि म्हणते अजून खूप काम करायचे आहे यासाठी शक्ति दे आमच्या बरोबर आशिर्वाद असु दे बये आमच्या या कार्यात अधिक वाढ होण्यासाठी* ः
*दार उघड बये दार उघड*
*समतोल फांऊंडेशन*
*अध्यक्ष संजय केळकर सोबत विजय जाधव एस.हरीहरण व समतोल टिम*
धन्यवाद !!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!