क्रीडा व मनोरंजन

श्री मावळी मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. होतकरु मित्र मंडळाचा विजय

Spread the love

ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९७ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ६९ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटातील सामन्यात होतकरु मित्र मंडळाने मुंबईच्या अमर हिंद मंडळाचा अतिशय अतितटीच्या सामन्यात पराभव करून स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला.महिला गटात शिव शक्ती संघ, स्फुर्ती क्रीडा मंडळ ठाणे, संकल्प क्रीडा मंडळ ठाणे, शिव शक्ती स्पोर्ट्स क्लब – धुळे या संघांनी विजयी सलामी दिली.

महिला गटातील पहिल्या सामन्यात होतकरु संघाने मुंबईच्या मातब्बर अशा अमर हिंद संघाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात ३७ – ३६ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात अमर हिंद संघाने मध्यंतराला २१ – १२ अशी ९ गुणांची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर होतकरुच्या ऐश्वर्या राऊत, विधी शिंदे यांनी अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. सदर सामना शेवटच्या चढाई पर्यंत ३६ – ३६ अशा समसमान गुणांवर होता. अमर हिंदच्या श्रद्धा कदमची होतकरुच्या सायली शिंदेने यशस्वी पक्कड करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

महिला गटातील दुसऱ्या सामन्यात, ठाण्याच्या स्फुर्ती क्रीडा मंडळाने ठाण्याच्या माउली क्रीडा मंडळाचा ४२ – ४० असा २ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात स्फुर्ती क्रीडा मंडळाने अतिशय आक्रमक खेळ करीत मध्यंतराला २८ – १६ अशी १२ गुणांची आघाडी घेतली होती.  परंतु मध्यंतरानंतर माउली क्रीडा मंडळाच्या नेहा वर्मा व नीलम पराडकर यांनी सुरेख खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली परंतु त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.

पुरुष गटातील सामन्यात ठाण्याच्या महारुद्र युवा संस्था या संघाने उपनगरच्या ओम क्रीडा मंडळाच्या ३६ – ३१ असा ५ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात महारुद्र युवा संस्था संघाने मध्यानंतरला १७ – १० अशी १० गुंणांची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर ओम साईच्या निलेश शिर्के याने एकाकी झुंज देत आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा अयशस्वी प्रत्यन केला.

पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या साई क्रीडा मंडळ संघाने अरुण क्रीडा मंडळाचा  ३० – २४ असा ६ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला साई क्रीडा मंडळ संघाने १४ – १० अशी ४ आघाडी घेतली व सामना संपेपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवली.

अन्य निकाल
पुरुष गट :
श्री विठ्ठल क्रीडा मंडळ – ठाणे (४३) x अंबिका सेवा मंडळ – उपनगर (८)

गुड मॉर्निंग स्पोर्ट्स – मुंबई शहर (५०) x जय शंकर क्रीडा मंडळ – ठाणे (२९)
अंकुर स्पोर्ट्स क्लब – मुंबई शहर (३६) x स्व. आकाश क्रीडा मंडळ – ठाणे (१९)
वीर परशुराम संघ – उपनगर (४४) x आनंद स्मृती प्रभोधिनी – ठाणे (३३)
ऋषी वाल्मिकी स्पोर्ट्स क्लब –  पालघर (३०) x होतकरू मित्र मंडळ – ठाणे (२५)
विजय स्पोर्ट्स क्लब – ठाणे (३८) x महा शक्ती युवा प्रतिष्ठाण – पुणे (१८)

आजच्या दिवसातील सर्वत्कृष्ट चढाई पट्टू
संदीप यादव – श्री साई क्रीडा मंडळ – उल्हासनगर

आजच्या दिवसातील सर्वत्कृष्ट पक्कड
जतीन सादने – ऋषी वाल्मिकी स्पोर्ट्स क्लब – पालघर

महिला गट :
आजच्या दिवसातील सर्वत्कृष्ट चढाई पट्टू

मोक्षा पुजारी – ऋषी वाल्मिकी स्पोर्ट्स क्लब – पालघर

आजच्या दिवसातील सर्वत्कृष्ट पक्कड
ऐश्वर्या राऊत – होतकरु मित्र मंडळ – ठाणे

पुरुष गट :
1) MG_2852-web = स्व. आकाश क्रीडा मंडळ, वडू नवघर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर

2) MG_2854-web = जय शंकर क्रीडा मंडळ, कल्याण विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर

3) MG_2856-web = जय शंकर क्रीडा मंडळ, कल्याण विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर

4) MG_2860-web = अरुण क्रीडा मंडळ, ठाणे विरुद्ध श्री साई क्रीडा मंडळ, उल्हासनगर

महिला गट :
1) MG_2754-web = होतकरू मित्र मंडळ, ठाणे विरुद्ध अमरहिंद मंडळ

2) MG_2756-web = होतकरू मित्र मंडळ, ठाणे विरुद्ध अमरहिंद मंडळ – यशस्वी चढाई

3) MG_2759-web = होतकरू मित्र मंडळ, ठाणे विरुद्ध अमरहिंद मंडळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!