ताज्या घडामोडी

पालघर जिल्ह्यातील कला शिक्षकांनी सुट्टीच्या कालावधीत रंगवल्या शाळेच्या भिंती, उपक्रमाचे समाजातून कौतुक

Spread the love

प्रमोद पाटील,
पालघर जिल्हा प्रतिनिधी,दि.४
पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या माध्यमातून बुधवारी (तारीख ४) पालघर येथील स. तु. कदम विद्यालयाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. शाळेत शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी याचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होणार आहे.

गेल्या दोन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करून पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कला शिक्षकांनी एकत्र येऊन पालघर येथील जीवन विकास संस्थेच्या स. तु. कदम विद्यालयाच्या व्हरांडामध्ये ” वाचाल तर वाचाल, सूर्यमाला, मूल्यशिक्षण दृष्टी आणि दृष्टीकोन, कणा कविता , पाणी वाचवा- झाडे वाचवा-पृथ्वी वाचवा, वारली कला, शासन यंत्रणा, बारावीनंतर कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत” आदी प्रबोधनात्मक चित्रे, विविध विषयांवर पूरक असे सुविचार भिंतीवरील चित्रांच्या रूपात कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे, माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत, सचिव नितीन जैतकर, उपाध्यक्ष प्रीतम घरत, चंद्रकांत सोनवणे, अजय धांगडा, सर्वेश मोगरे, राजेश पाटील, निलेश दवडा, दर्शना पाटील, उज्वल पारगावकर, शैलेश जोदळेकर, विनय पाटील यांनी आपल्या कुंचल्याने अत्यंत आकर्षक अशी चित्रे रंगवून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत.

यावेळी कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे यांनी सांगितले की, यापूर्वी कला शिक्षकांनी वाणगाव येथील ज. म. ठाकूर विद्यालय आणि माहीम येथील भुवनेश किर्तने विद्यालयाच्या भिंतींवर चित्रे रेखाटून बोलक्या केल्या असून भविष्यातही हा उपक्रम सुरूच राहील.

याप्रसंगी जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वागेश कदम, पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, पालघर तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण शिंदे, उपमुख्याध्यापिका मृणाली शिरगावकर, पर्यवेक्षक रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!