ताज्या घडामोडी

जॉय” च्या वतीने कविता स्पर्धेचे आयोजन……!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई :- प्रत्येकाला आपण ज्या शाळेत शिकलो,लहानाचे मोठे झालो, तिच्याबद्दल प्रेम,आपुलकी व अभिमान असतोच.आपल्याला ज्यांनी शिकविले,घडविले त्या शिक्षकांबद्दल आदर असतो.नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून जॉय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने ” माझी शाळा ” या विषयावर कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून १८ वर्षवरील कोणीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते.कविता स्वरचित, सुवाच्य व सुंदर हस्ताक्षरात १६ ओळी पर्यंत लिहिलेली असावी तसेच ती पूर्वप्रकाशीत नसावी. स्पर्धकांनी आपल्या कविता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत स्पीड पोस्ट व कुरीअरनेच पाठविलेली स्वीकारण्यात येईल.व्हाट्स-अप, ई मेल आणि टाईप केलेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य नसेल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. कविता मराठी भाषेत लिहिलेली असावी.पाहिले तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिके म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल
कविता पाठविण्यासाठी पत्ता
जॉय ऑफ गिविंग संस्था मुंबई
C/O गणेश वसंत हिरवे
२-१२ पार्वती निवास,
रामनगर, बांद्रेकरवाडी
जोगेश्वरी पूर्व
मुंबई-४०००६०
९९२०५८१८७८

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!