ताज्या घडामोडी

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या हस्ते ‘माझी माय सरस होती’ पुस्तकाचे प्रकाशन…..!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:- स्वातंत्र्यसैनिक डॉ परशुराम पाटील यांच्या कला केंद्र अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था कार्य करते. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. यावेळी या उपक्रमाचे ४४ वे पुष्प आहे. मार्च महिना हा महिलाचा महिना म्हणून ओळखला जातो. हेच निमित्त घेऊन हे पुष्प पूर्णपणे महिलांना समर्पित केले जाणार आहे. वीसहून अधिक महिलांचा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग असणार आहे. समाजासाठी, कुटुंबासाठी दिपस्तंभ ठरलेल्या चार दिवंगत महिलांनाच्या नावाचे दखलपत्र चार कर्तृत्ववान महिलांना देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शिवाय ‘आई’ या विषयाला वाहिलेले ‘माझी माय सरस होती’ हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. या अभिनव कार्यक्रमाला अभिनेत्री सुप्रिया पाठारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते गुणी महिलांचे सन्मान आणि पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कालाश्रमने आजवर ज्या दिवंगत महिलांच्या नावाने पुरस्कार दिले त्या तीस महिलांचे छायाचित्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर घेण्यात आलेली आहेत. कलाश्रमचे हितचिंतक कवी, गीतकार दिपक कांबळी यांची दिवंगत मातोश्री अशालता कांबळी यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. स्पर्धकांना आई सोबतचे छायाचित्र पाठवण्याची विनंती केली होती. त्याला अनुसरून चार ओळी लिहिण्याची ही स्पर्धा होती. त्या निवडक कवितांचा त्यांच्या छायाचित्रासह यात समावेश केलेला आहे. नंदकुमार पाटील यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून संकलनाची जबाबदारी नंदिनी पाटील यांनी सांभाळलेली आहे. बुधवार, दिनांक ३० मार्च २०२२ या दिवशी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे फक्त निमंत्रित पाहुणे, सहभागी कलाकार, कलाश्रमचे सभासद- सदस्य यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आदर्श शिक्षिका व कलाश्रमच्या सल्लागार स्वप्ना पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.असे संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!