आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्याध्यापक स्प्रिंग बोर्ड प्रणाली द्वारे मुख्याध्यापक ऑनलाइन सक्षमीकरण प्रशिक्षण – कार्यशाळा संपन्न..

Spread the love

मुख्याध्यापक स्प्रिंग बोर्ड प्रणाली द्वारे मुख्याध्यापक ऑनलाइन सक्षमीकरण प्रशिक्षण – कार्यशाळा संपन्न.. Principal Online Empowerment Training by Principal Spring Board System – Workshop Concluded..

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १५ मार्च.

मिपा औरंगाबाद ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,भवानी पेठ पुणे व पंचायत समिती शिक्षण विभाग मावळ.
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ मार्च २०२३ रोजी मुख्याध्यापक स्प्रिंग बोर्ड प्रणाली द्वारे मुख्याध्यापक ऑनलाइन सक्षमीकरण प्रशिक्षण – कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेसाठी पंचायत समिती मावळचे गटशिक्षणाधिकारी. सुदाम वाळुंज  ,विस्तार अधिकारी  थोरवे  यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटना समारंभास टाकवे केंद्राचे केंद्रप्रमुख. शिवाजी जरक  ,मुख्याध्यापक प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष. संतोष गायकवाड , माध्यमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष राजेश गायकवाड , पंचायत समिती समग्र शिक्षा अभियान विभागाच्या. सुचिता भोई विषय साधन व्यक्ती, एमआयटी कॉलेजचे प्राचार्य विनोद साळवे  व रसायनशास्त्राचे प्राध्यापक खंदारे  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यशाळेला ३७ माध्यमिक शाळांचे पात्र मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक. श्रीमती आरती कुंडले विषय साधन व्यक्ती पंचायत समिती मावळ व तंत्रस्नेही म्हणून  संदीप सपकाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवडे व  केशव चिमटे सर नगरपरिषद शाळा क्र -३ यांनी तंत्रस्नेही म्हणून कामकाज पाहिले.

 

शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले . या कार्यशाळेसाठी एमआयटी महाविद्यालयाच्या स्टाफचे विशेष सहकार्य लाभले. आनंददायी वातावरणामध्ये कार्यशाळा संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!