ताज्या घडामोडी

आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षणार्थींची भूमिका महत्त्वाची- तहसीलदार मा. गणेश शिंदे.

Spread the love

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील साधन संपत्ती आणि निसर्गाची उधळण असलेला डोंगर रांगा, नद्यांची खोरी,घनदाट जंगल, पावसाळ्यात प्रचंड पाऊस, यांनी परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे शिराळा. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 965 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात महापुराचे संकट ओढवलेले असते त्यातच भर म्हणजे काही वेळेला भूखखन होतात. तर जंगलातील प्राणी जसे बिबट्या, गवे वाड्या वस्त्यांमध्ये येऊन धुमाकूळ घालतात. त्यामुळे येथील माणसाचे जीवन दगदगीचे बनले आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या येणाऱ्या आपत्ती आणि दगदगीचे मानवी जीवन यामुळे येथील लोकांना आपत्तीच्या काळात कोणती खबरदारी घ्यावी किंवा आपत्ती येऊन गेल्यानंतर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2022 23 आयोजित केला आहे. विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ चिखली संचलित देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन शिराळा तालुक्याचे तहसीलदार मा. गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे अध्यक्ष मा. अमरसिंग नाईक हे अध्यक्षस्थानी होते. निवासी नायब तहसीलदार मा.अ. द. कोकाटे, गट विकास अधिकारी मा. संतोष राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील हे उपस्थित होते. यावेळी मा. गणेश शिंदे यांनी शिराळा तालुक्यातील असलेली पार्श्वभूमी, आणि येणाऱ्या आपत्ती विचारात घेऊन आपत्ती काळात घ्यावयाची काळजी तसेच आपत्तीनंतर करावयाची उपाय योजना याविषयीचे प्रशिक्षण आयोजित करावे, यासाठी स्वतंत्र हॉल, सुविधा असेल अशा ठिकाणी तसेच यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अंगणवाडी सेविका, होमगार्ड, सरपंच, उपसरपंच,सदस्य,मित्र मंडळाचे सदस्य,रेशन दुकानदार, राष्ट्रीय सेवा योजना,एन.सी. सी. चे विद्यार्थी यांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून त्यांनी चिखली येथील देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित केले. अर्थात महाविद्यालयाने हे प्रशिक्षण 15 मार्च ते 26 मार्च या काळात आयोजित करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. सदर शिबिरात 95 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगी मा. गणेश शिंदे यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग गाव, गावातील लोक यांच्यासाठी करावा, प्रशिक्षणार्थी यांना मिळालेली ही संधी मोलाची आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी सामाजिक कार्यात संस्था नेहमीच अग्रेसिव असते असे सांगून ही संधी लाख मोलाची असून यामध्ये आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य होईल असे सांगून या प्रशिक्षणाची उद्दिष्टे व रूपरेषा स्पष्ट केली. अध्यक्षपदावरून बोलताना मा. अमरसिंग नाईक यांनी सकाळी ६.०० ते सायं ७.०० या वेळेत होणारे हे प्रशिक्षण आगळे वेगळे आहे, याचा तुम्हा सर्वांच्या जीवनात तसेच तुमचे गाव गावातील लोक यांच्यासाठी उपयोग करावा असेही स्पष्ट केले. प्रशिक्षण देण्यासाठी श्री मंगसुळी, सौ.शकुंतला राय, श्री अनिल शेलार आणि दिया केने हे प्रशिक्षित तज्ञ विविध व्याख्याने, प्रात्यक्षिके याद्वारे प्रशिक्षण देणार आहे़त.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!