ताज्या घडामोडी

आयडियल अ विभाग क्रिकेट: केडीए हॉस्पिटल विजेता

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे व क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते गौरवार्थ आयडियल आंतर हॉस्पिटल टी-२० अ विभाग क्रिकेट स्पर्धेमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाने विजेतेपद पटकाविले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट सहकार्याने झालेल्या स्पर्धेत अष्टपैलू प्रतिक घरत, जयेश भुंगावले, अलकेत तांडेल यांच्या खेळामुळे केडीए हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा ३२ धावांनी पराभव करून अ विभाग विजेतेपदाला गवसणी घातली. डॉ. हर्षद जाधव, कृपाल पटेल यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीची झुंज देऊनही सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, क्रीडा संघटक ओमकार मालडीकर, प्रशिक्षक दीपक पाटील, क्रीडाप्रेमी राजन लाड, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी देणारा सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा निर्णय, त्यांना फलदायी ठरला नाही. प्रतिक घरत (१६ चेंडूत २३ धावा), हर्षित ओझा (२२ चेंडूत १७ धावा), मानस पाटील (१८ चेंडूत १६ धावा), अलकेत तांडेल (१८ चेंडूत १४ धावा), जयेश भुंगावले (११ चेंडूत १४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलने १७.३ षटकात सर्वबाद ११० धावांचा टप्पा गाठला. प्रतिस्पर्ध्यांची ३ बाद ८७ धावसंख्येची धडाकेबाज आगेकूच डॉ. हर्षद जाधव (२१ धावांत ३ बळी), विशाल सावंत (१८ धावांत २ बळी), कृपाल पटेल (१४ धावांत १ बळी), सुशांत गुरव (१२ धावांत १ बळी), रोहित सोमर्डे (४ धावांत १ बळी) आदी गोलंदाजांनी नियंत्रित केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!