महाराष्ट्र

मुंबईच्या धर्तीवर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुणे लोणावळा लोकल प्रवासाची मुभा द्यावी

Spread the love

मुंबई : येथे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे – लोणावळा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोणावळ्यावरून अनेक प्रवासी शहरात कामधंद्याच्या निमित्ताने प्रवास करतात. तसेच आसपासच्या गावातील व शहरांमधील नागरिक नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने लोकलने प्रवास करतात.नागरिकांसाठी हा प्रवासाचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवास सामान्य नागरिकांना बंद असल्याने सध्या सर्व प्रवासी खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. यामुळे प्रवास खर्चात वाढ झाल्याने दरमहा घरखर्चात काटकसर करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे मुंबईमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा दिले आहे, त्या धर्तीवर लोणावळा पुणे लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी प्रवासी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!