ताज्या घडामोडी

मधुरा भोळे यांना ” बेस्ट टीचर अवॉर्ड ‘ जाहीर.

Spread the love

संजीवनी कोचिंग सेंटर, रत्नागिरी मधील शिक्षिका मधुरा अशोक भोळे यांना दि. गुरू इजुकेशन इंडिया ‘ चा ‘ बेस्ट टीचर अवॉर्ड ‘ जाहीर झाला. गेली अनेक वर्षे त्या गणित, विज्ञान, अबॅकस, वेदिक गणित इ.विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत आहेत.
अबॅकस, वेदिक गणित स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थ्यानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देदीप्यमान यश संपादन केले आहे.
अत्यंत सोप्या भाषेत गणित व विज्ञान शिकवणे तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी त्यांची ओळख आहे.
सदरच्या कामगिरीची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गुरू एज्युकेशन इंडिया संस्थेचे डायरेक्टर श्री. महेंद्र गिरी , संजीवनी कोचिंग सेंटरचे फौंडर आणि डायरेक्टर डॉ.केदार कुंभार, श्रीम. श्रध्दा भोळे तसेच विद्यार्थी व पालक यांनी यावेळी मधुरा मॅडमचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!