ताज्या घडामोडी

*खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह- अविनाश पाटील

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस दि. १२ डिसेंबर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रेरणा दिवस आहे.  पवार साहेबांची गेल्या अनेक वर्षातील विविध क्षेत्रातील चौफेर कामगिरी आम्हा सर्वांच्या आयुष्यात अतिशय मोलाची आणि मार्गदर्शक ठरणारी आहे. म्हणूनच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही गेली अनेक वर्षे स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करीत असतो. त्यालाच अनुसरून यावर्षी देखील दि. १३ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०२२ या कालावधीत ” स्वाभिमान सप्ताह ” चे आयोजन करीत आहोत.अशी माहिती सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

यंदाच्या वर्षी स्वाभिमान सप्ताहात मोजके पण लक्षणीय कार्यक्रम खालील कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबरोबरच जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करणार आहोत. सध्या जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कतार येथे चालू आहेत. त्यादृष्टीने हा खेळ देशभरात प्रसिध्द व्हावा यासाठी आपल्या जिल्ह्यात तालुका स्तरावर फुटबॉल स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.  पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती मोहीम हाती घेऊन प्रत्येक तालुक्यात व गावपातळीवर राबविण्यात यावी. गावातील नदी, नाले साफ करणे, कचरा व प्लॅस्टिक पिशव्या इ. एकत्रित करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे तसेच वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेणे, यासारखे पर्यावरण विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. गरजु व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता वह्या, पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करणेत येईल.

महाराष्ट्रात महिला व युवती वरील अत्याचारांवर काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक महिला / युवती कार्यकर्ता यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध प्रसंगांना सामोरे जाताना कायद्याचे योग्य ज्ञान अवगत होणे आवश्यक आहे. याकरिता पक्षाच्या वकील सेलच्या मदतीने तालुका व जिल्हास्तरावर कायदे विषयक माहिती देणारी शिबिरे आयोजित करण्यात येतील. जेणेकरून समाजातील महिलांना/ युवतींना कायद्याचे ज्ञान पोहचविण्यास मदत होईल.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक अध्यक्ष विराज नाईक, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा पुजा लाड आदी उपस्थित होते

दि.१२ डिसेंबर रोजी जिल्ह्यात व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करणेत येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!