आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड.

महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान.

Spread the love

महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड.Election of Ganesh Bhegde as the State President of Maharashtra Pradesh BJP Kisan Morcha.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ८ जूलै.

पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे   माजी. अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल मावळ तालुका भारतीय जनता पक्षाकडून या निवडीमुळे मावळात जल्लोष  करण्यात आला..

मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.  भेगडे यांना महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदान केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस महापौर मुरलीधर मोहोळ, विक्रम पाटील, उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, महामंत्री संजय केनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!