ताज्या घडामोडी

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन कॅन्सर फौंडेशनला मदत

Spread the love

वाढदिवस म्हटलं की,पार्टीच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करणे हे जणू समीकरणच बनले आहे.
पण पन्हाळा येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक कै.मु.गो.गुळवणी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे नातू वेदमूर्ती अमृत गुळवणी गुरुजी रा.पन्हाळा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अवांतर खर्चाला फाटा देऊन तीच रक्कम आर्थिक दुर्बल अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देणार्या वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.
वाढदिवसाचा खर्च टाळून विधायक कामासाठी त्या पैशांचा विनियोग करणे हे समाजामधे एक आदर्श उदाहरण आहे.असं वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!