ताज्या घडामोडी

सुरज व्हनाजे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड….

Spread the love

मुरुम, ता. उमरगा,  (प्रतिनिधी )

उमरगा तालुक्यातील श्री. श्री. रविशंकर विद्यामंदिर येथील कुमार सुरज बालाजी व्हनाजे यांची धावण्यांच्या स्पर्धेत व थाळीफेकमध्ये विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी स्टेडीयम, उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकुरगा येथील शिवशक्ती विद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरिय मैदानी खेळात आव्वल आलेल्या खेळाडूंची जिल्हास्तरीय खेळासाठी निवड करण्यात आली होती. त्यात उमरगा येथील श्री. श्री. रविशंकर विद्यामंदिरचा कुमार सुरज बालाजी व्हनाजे या विद्यार्थ्याने शनिवारी (ता.७) रोजी झालेल्या १०० मीटर धावणे व थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्याची निवड विभागीय खेळासाठी झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कराताना शिक्षक खमीतकर व खेळाडू सुरज व्हनाजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!