ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांच्या हस्ते दिडशे पिठाच्या गिरण्या चे वाटप

Spread the love

लोहा तालुका प्रतिनिधी संतोष चेऊलवार

लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने काल शनिवारी लोहा येथील आमदार शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दीडशे पिठाच्या गिरण्या चे वाटप आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कोरियन टेक्नो इंडस्ट्रीज मॉडेल कंपनी व कोरियन रेगुलर मॉडेलच्या दीडशे गिरण्या चे वाटप करण्यात आले या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यागिरण्या मधून मसाले कडधान्य मिरची खारीक खोबरे हळद व विविध धान्याचे पीठ तयार केल्या जाते या पिठाच्या गिरण्या लोहा कंधार मतदार संघातील महिलांना सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांनी 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी सौ आशाताई शिंदे बोलताना म्हणाले की लोहा कंधार मतदार संघातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मी व आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब कटिबद्ध असून येणाऱ्या काळात लोहा कंधार मतदार संघातील महिलांना विविध माध्यमातून व बचत गटामार्फत रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे मतदारसंघात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला असून लोहा कंधार तालुक्यातील तरुणांच्या तरुण यांच्या हाती उद्योगधंद्याच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यावेळी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, सौ शशिकला पवार, अश्विनी कापुरे, शिवकांता शेटे सुनिता चव्हाण, मीनाताई पेटवडजकर,हरबळ उपसरपंच अवधूत पाटील शिंदे, ज्ञानेश्वर पवार, अजित पाटील बोरगावकर, माधव घोरबांड, नागेश पाटील खांबेगावकर, मारुती ढगे,सिद्धू पाटील, वाडीचे सरपंच सखाराम लोंढे, धनाजी पाटील ढगे, सरपंच जुलेखा पठाण, उपसरपंच दत्ता पाटील बगाडे, राहुल बोरगावकर, वसंत मंगनाळे,गिरीश डिगोळे,शिवराज दापशेडकर सह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!