ताज्या घडामोडी

खा. धैर्यशील माने यांच्या पेठ ते सांगली रस्त्याच्या मागणीला यश

Spread the love

टेंन्डर नोटीस निघाले लवकर रस्ताच्या कामाला प्रारंभ होणार

कोकरुड/प्रतिनिधी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ पेठ ते सांगली या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती. त्यामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलेले होते. याकडे लक्ष वेधत येथिल रस्ता कामांची तातडीने सुरुवात करावी अशी ऑगस्ट महीन्यात मागणी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली होती. यावर मंत्री नितीन गडकरी यांनी पेठ – सांगली रस्त्याच्या काँक्रीटकरणसह चौपदरीकरण करण्याच्या ९४५ कोटी रुपयांच्या डीपीआर ला लवकरच मंजुरी देऊन पुढील २ महिन्यामध्ये काम सुरु करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रीय दळणवळण मंत्री यांनी पेठ सांगली या ४१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास ६११ कोटी ६० लाख रुपये मंजूर करून त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. पुढील डिसेंबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी महिन्यांमध्ये पेठ सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे. बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या पेठ सांगली रस्त्याच्या कामाचा मागणीला खा.धैर्यशिल माने यांना यश मिळाले आहे.

शिरोली ते अंकली या रस्त्याचे काम लवकरच होणार

चौकट – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पेठ सांगली रस्त्याच्या कामास निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानून लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली अंकली या राष्ट्रीय महामार्गाचेही काम सुरू करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!