ताज्या घडामोडी

मनीषा कुरणे व करून मोहिते यांचा यशवंत युवक संघटनेच्या वतीने सत्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / किनरेवाडी ता. शिराळा या तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचातीने विधवा प्रथा बंदी ठराव करून समाजासमोर आदर्श ठेवला. विधवा महिलांना लग्न कार्यात बोलवून हळदी कुंकू समारंभ घेतला. याकामी ज्यांनी गेल्या ५ वर्षापासून स्वतः विधवा असून सुवासिनी सारखं राहण्याचा निर्णय घेतला आणि किनरेवाडी येथील ग्रामस्थांचे प्रबोधन केले त्या पाचुंब्री जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मनिषा मोहन कुरणे – दंडवते रा. शिरशी व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या करुणा बाबुराव मोहिते जिल्हाध्यक्षा – सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघ. यांचा सत्कार यशवंत युवक संघटनेच्या वतीने युवानेते रणधीर नाईक यांच्या उपस्थित नगरसेविका ॲड. सौ. नेहाताई सुर्यवंशी व सौ. सीमाताई कदम यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी ॲड. नरेंद्र सुर्यवंशी माजी उपसरपंच विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!