ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान करून करुया साजरा, जनतेने पुढाकार घ्यावा.समवेदना मेडीकल फौंडेशनचे अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यांचे समाजाला कळकळीचे आवाहन.

Spread the love

दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढतच आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आजारांनी आपल्या देशाला प्रचंड ग्रासले आहे. त्यामुळे नव-नविन पिढी वेगवेगळ्या आजारात अडकून बळी पडत आहे. शासन, प्रशासन ज्या अनुषंगाने काम करीत आहे, त्या अनुषंगाने जनतेने सुध्दा *” रक्तदान”* करावे.
रोज कोठे ना कोठे अपघात, कॅन्सर, थॅलेसिमिया, सिकलसेल हिमोफिलीया,प्युअर रेड सेल अप्लासिया, अप्लास्टीक अॅनिमिया अशा अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असते परंतु थॅलेसिमीयासारख्ये अनुवांशिक आजार हे गर्भाशयातूनच जन्माला येत असतात. अशा रुग्णांना तर जिवंत असेपर्यंत महिन्यातून २ ते ३ वेळा शरीरासाठी रक्ताची गरज लागते. तर गरोदर महीलानां अत्यावश्यक वेळी रक्त चढवावे लागते.त्यामुळे रुग्ण आपले जीवन जगु शकतात. थैलेसिमिया मुलानां जर का रक्ताचा नियमीतपणे पुरवठा नाही झाले तर त्यांची जगण्याची आशा नाहीशी होत जाते.
रुग्णांच्या चेह-यावर सदैव हास्य व परिवारा सोबत आनंदाने आपले जीवन जगणे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रक्तदान करणाऱ्यांच असतो.
रक्त पीढीमधुन रुग्णानां रक्त उपलब्ध करू देण्यात यावे अशा प्रकारचे पत्र सांगली जिल्ह्यातील सर्व ब्ल्ड बँकाना देण्यात आले आहे.
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा* असाच अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशातील प्रत्येक घटकेने, संस्था, तरुण मंडळ, मंदिर, मस्जीद, महाविद्यालये, शासकिय व निमशासकिय कार्यालये, व जनतेने मोठ्या उत्साहात प्रत्येक वर्षात दोन वेळा रक्तदान करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करूया
तुम्ही केलेले “रक्तदान” हे कोणाला तरी “जीवनदान” ठरु शकते यापेक्षा मोठे पुण्यकर्म कोणतेही नाही.
*”जगा जगवा आणि जगू दया”* असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष श्री. बरकत पन्हाळकर, सांगली जिल्हाध्यक्ष, रंजित पाटील, सनातन भोसले, कार्याध्यक्ष शामली वायदंडे, झाहीद परवेगार, बबन भोसले, करीम नदाफ, नूर शेख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!