ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. किरण सगर यांचा सत्कार

Spread the love
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. किरण सगर यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार मुरुम, ता. उमरगा, ता. १० (प्रतिनिधी) : उमरगा येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. किरण सगर यांची आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रमजीवी परिवाराच्या वतीने शुक्रवारी (ता. १०) रोजी विठ्ठलसाई कारखान्याच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. प्रा. किरण सगर हे गेल्या तीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मलन चळवळीत सक्रिय आहेत. अंनिसचे राज्य सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अक्षरयात्रा या मासिकाचे संपादक म्हणून ते काम पहातात. सामाजिक कार्यात त्यांचा विशेष पुढाकार आहे.
    मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या वतीने प्रा. किरण सगर यांची नुकतीच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील व सरचिटणीस माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, चिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे उमरगा तालुका शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
    या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. गरूड म्हणाले की, प्रा. सगर हे साहित्य निर्मिती
    अंधश्रद्धा निर्मुलन या विविध सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांची निवड ही श्रमजीवी परिवाराचा सन्मान असल्याचे डॉ. गरूड म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी, उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी, प्रा. उमेश खरोसेकर, प्रा. डॉ. राम सोलंकर, प्रा. दादा सुर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!