महाराष्ट्र

नितीन गडकरींचे मोठ विधान, महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री..

Spread the love

राजकीय                                                नितीन गडकरींचे मोठ विधान, महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री..

नागपूर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी बावनकुळे यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाही, असंही गडकरी यांनी सांगितलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने बावनकुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

गडकरी यांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केल्याने अनेक अर्थ काढले जात आहेत. फडणवीस जर पुढचे मुख्यमंत्री होणार असतील तर शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!