ताज्या घडामोडी

अध्यापक संघाचा रविवारी विभागीय मेळावा – मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ संलग्नित राजापूर, लांजा व रत्नागिरी तालुक्यांचा विभागीय मेळावा रविवार दि 20 रोजी मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पाली येथे स. 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न होणार आहे.कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून सौ.प्रियदर्शनी रावराणे प्राचार्या, मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली व विभागातील तालुकाध्यक्ष काम पाहणार आहेत.या मेळाव्यासाठी रत्नागिरी , लांजा , राजापूर सह जिल्ह्यातील अध्यापक संघाच्या सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष सोकासने, एकनाथ बुळे व एकनाथ पाटील यांनी केले आहे.या मेळाव्याच्या निमित्ताने विविध शैक्षणिक विषयावर विचारमंथन केले जाणार असून जिल्ह्यातील प्रलंबित समस्या व राज्यस्तरावरील धोरणात्मक प्रलंबित विषयांबाबत चे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ संलग्नित राजापूर, लांजा व रत्नागिरी तालुक्यांचा विभागीय वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने शैक्षणिक संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : फायदे तोटे या विषयावर इम्तियाज शेख , वैद्यकीय देयक सादर करण्याची पध्दत या विषयावर मंगेश जाधव , नवीन पेन्शन योजनेचे तोटे या विषयावर जिल्हा सचिव रोहित जाधव व माध्यमिक शाळा संहिता मार्गदर्शन या विषयावर कायदेशीर सल्लागार आत्माराम मेस्त्री मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न व राज्यस्तरावरील धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तील निवेदन देण्यात येणार आहे.
या विभागीय मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष भारत घुले , संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार सदाशिव चावरे , कार्याध्यक्ष संभाजी देवकते,उपाध्यक्ष गणपत शिर्के ,गिरीश पाटील ,सुरेश चिकणे ,सुशांत कविस्कर ,सचिव रोहित जाधव ,कोषाध्यक्ष सर्जेराव करडे ,सल्लागार रामचंद्र महाडिक, सी. एस.पाटील व संपर्कप्रमुख सचिन मिरगल उपस्थित राहणार आहेत. विभागातील जिल्हा पदाधिकारी जिल्हा सहसचिव फिरोज तांबोळी ,जिल्हा महिला प्रतिनिधी सौ. ईशा पेडणेकर , जिल्हा संघटक दिलीप वासनिक , ज्येष्ठ सल्लागार विनायक राऊत , अल्पसंख्याक संघटक इम्तियाज शेख , जेष्ठ सल्लागार सौ. साजिदा बिजापुरे , जिल्हा संघटक इम्तियाज सिद्दिकी यांच्यासह तिन्ही तालुक्यांच्या कार्यकारिणी सदस्यांनी माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!