मांगरूळचा पै.आदित्य मस्के ची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड..
कोकरूड/वार्ताहर
चिंचोली ता.शिराळा येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यु इंग्लिश स्कूल शिराळाचा विद्यार्थी व मांगरुळ गावचा मल्ल पै.आदित्य मनोज मस्के याने ५५ किलो वजन गटात चमकदार कुस्ती करून प्रथम क्रमांक पटकावला यामुळे त्याची
मिरज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. पै.आदित्य मस्के सध्या पुणे येथे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे, केंद्रीय कुस्तीकोच वरुण त्यागी , पै चंद्रशेखर धुमाळ, पै संजय खांडेकर , पै कृष्णा फिरंगे यांच्या
मार्गदर्शनाखाली सराव करित आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई सेंटर ) यांच्या मार्फत गेल्याच वर्षी इंदोर (भोपाळ) येथे नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. दरम्यान आदित्य याची निवड झाल्या बद्दल परिसरातून अभिनंदन होत आहे.