ताज्या घडामोडी

शिराळ्यात तोरणा ओढा संरक्षक भिंतीच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाकडून ४ कोटी ४७ लाख रुपये प्रशासकीय मान्यता ..सत्यजित देशमुख.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी:-
शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या अंदाजपत्रकास जलसंपदा विभागाने ४ कोटी ४७लाख रुपये इतक्या रक्कमेच्या प्रशासकीय मान्यता मिळाली असून तोरणा ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे.अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.मागील सन-२०१२-१३ साला मध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब विधान परिषद सभापती असताना या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्याचे काम पूर्ण झाले आहे.
शिराळा येथे सन- २०१९ व २०२१साली झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला होता.यावेळी ओढ्यालगतचा सर्व भाग व रस्ते खचून गेले होते.मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. यामुळे तोरणा ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या नागपूर अधिवेशन काळात राज्याचे उपमुख्यमंत्री,वित्त व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोरणा ओढा संरक्षक भिंतीच्या कामाची मागणी केली होती. या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला आहे.या ओढ्याच्या कामासाठी ४कोटी ४६ लाख ७१ हजार ३५८ रुपये इतकी मंजूर झाली आहे.या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.या कामाची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण होईल व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती सत्यजित देशमुख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!