आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाट्याजवळ पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सिंहगडावर आलेल्या पर्यटकांनी हवेली पोलीस ठाण्यात येऊन खबर दिल्याने पोलीस व वन विभाग अलर्ट..

Spread the love

सिंहगड – सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाट्याजवळ पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आवाज न्यूज : कोंढणपुर प्रतिनिधी, १५ ऑक्टोबर..

सिंहगडावर आलेल्या पर्यटकांनी हवेली पोलीस ठाण्यात येऊन खबर दिल्याने पोलीस व वन विभाग अलर्ट झाला आहे. हवेली पोलीसांनी सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क करण्यास सुरुवात केली असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल होत आहे.

वारजे माळवाडी येथे राहणारे प्रविण वायचळ व पूजा वायचळ हे पती-पत्नी सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत येताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोंढणपूर फाट्यापासून काही अंतरावर गोळेवाडीच्या बाजूला एक पिवळे व काळे पट्टे असलेला वाघ त्यांना रस्ता ओलांडताना दिसला. घाबरलेल्या वायचळ पती-पत्नीने आरडाओरडा केला व वाहने थांबवून ही माहिती दिली. तसेच पायथ्याशी आल्यावर स्थानिक रहिवासी व व्यावसायिकांनाही माहिती दिली.

प्रविण वायचळ व त्यांची पत्नी पूजा वायचळ यांनी हवेली पोलीस ठाण्यात येऊन वाघ दिसल्याबाबत सविस्तर खबर दिली आहे. त्यावरुन नोंद घेण्यात आली असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे स्वतः घेरासिंहगड परिसरात पोलीस वाहनातून अलाऊंन्सिंग करुन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत.

ट्रेकर्सनी येणे टाळावे…….

जोपर्यंत वाघाचे अस्तित्व या भागात आहे की नाही याची वन विभाग पुष्टी करत नाही तोपर्यंत रात्री अपरात्री सिंहगडावर जाणाऱ्या ट्रेकर्सनी या भागात येणे टाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनीही रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे असेही आवाहन शेलार यांनी केले आहे.

‘पोलीस ठाण्याकडून माहिती मिळताच आम्ही संबंधित ठिकाणी निघालो आहोत. प्रत्यक्ष दर्शींशीही आम्ही बोलून खात्री करणार आहोत. पायाच्या ठशांची पाहणी करण्यात येणार आहे. जंगलात पाहणी करण्यासाठी ड्रोनही मागविण्यात आला आहे.’

– प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे वन विभाग.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!