ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत आष्टोली येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती-शिवाजी-महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

Spread the love

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर महराजांचा जन्म झाला होता.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. राज्य सरकारकडून १९ फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली जाते. महाराष्ट्रातील जनता मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा करते. या दिवशी ग्रामपंचायत आष्टोली येथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते.
कार्यक्रमांस ग्रामपंचायत आष्टोली सरपंच नंदकिशोर कोरे,सदस्य मोहित भाऊ अढाऊ,मंगेश भाऊ अढाऊ पोलीस पाटील, सौ. सुवर्णा अनिल अढाऊ अंगणवाडी सेविका, चेतन भाऊ अढाऊ,शाम भाऊ अढाऊ, विशाल भाऊ अढाऊ , सागर भाऊ दरेकर, प्रतीक भाऊ अढाऊ , चेतन भाऊ ढवळे , लक्ष्मण भाऊ पेठे, भाष्कर भाऊ ढवळे, गुणवंत भाऊ फरतोडे, विनोद भाऊ ढवळे , रोशन भाऊ राऊत इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!