ताज्या घडामोडी

धनगर समाजावर सातत्याने अन्याय……प्रवीण काकडे

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक ता. २८ एप्रिल २०२२ रोजी सामाजिक न्याय विभागाकडून घेण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील महामंडळाना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामध्ये १) महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ ५०० कोटींवरून १००० कोटी २) संत रोहिदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ ७३ कोटींवरून १००० कोटी ३) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ ३०० कोटीवरुन १००० कोटी ४) दिव्यांग वित्त व विकास महामंडळ ५० कोटींवरून ५०० कोटी निधी देण्यात आला परंतु महाराष्ट्रात धनगर समाज हा दोन नंबरवर असलेला व अतिमागास असलेल्या धनगर समाजाला यातून का वगळण्यात आले. मेंढपाळासाठी असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून धनगर समाजाला कोणत्या सुविधा, मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्याचा एकदा तपशील जाहीर करावा. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षांपासून एस. टी. आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी कायमस्वरुपी बाजूलाच ठेवली आहे. धनगर समाजाने काय तुमचे घोडे मारले का ? सातत्याने धनगर समाजावर अन्याय करीत आहात. मेढपाळावरती दररोज अन्याय होत असून साधी त्याची दखल घेतली जात नाही. डोगरी भागात रहाणाऱ्या समाज बांधवाना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. धनगर समाजाला का या सर्वच प्रक्रियेतून जाणून-बुजून वंचित ठेवण्यात आलंय. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा वापरा आणि फेका हीच निती वापरायची ही सर्वच राजकीय पक्षांची निती दिसून येत आहे. सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींकडून धनगर समाजाच्या मतावर निवडून आले आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्वच मंत्री, खासदार, आमदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण तसा अजून कोणीच प्रयत्न करीत नाहीत. सरकारकडून मागील अर्थ संकल्पात कोणत्या स्वरूपात किती निधी देण्यात आला आहे, ते जाहीर करण्यात यावे. धनगर समाजाच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक केलेली नाही. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत आज अखेर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थी याच्या स्कॉलरशिप बाबतीत, डोंगर-दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव यांना आजही रस्ते, आरोग्य, पाणी, वीजच्या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे धनगर समाजाला सर्वच सोयी-सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार असेल तर निश्चितच पुढील काळात धनगर समाज होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रवीण काकडेसाहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!