ताज्या घडामोडी

कामगारांच्या हितासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचविण्याचे आदर्श कार्य रयत क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून होत आहे.

Spread the love

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हाजी अरफात शेख (कॅबिनेट मंत्री दर्जा)

कामगारांच्या हितासाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य वर्गापर्यंत पोहोचविण्याचे आदर्श कार्य रयत क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून होत आहे आमचे मार्गदर्शक व सहकारी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी, बलुतेदार, कामगार यासह अन्य सर्वच प्रकारच्या प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम सतत चालू असते, मा. श्री. सदाभाऊ खोत राज्यांमध्ये मंत्री असताना अनेक निरनिराळ्या प्रकारे राज्याच्या हिताचे धोरण राबवले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या निरनिराळ्या योजनांची माहिती कार्यकर्ते यांनी तळागाळापर्यंत पोहोचवावी मी आजी अरफत शेख एका वाहतूक चालकाचा मुलगा असून मला त्यांचे प्रश्न ,अडचणी, मी जवळून पाहिले आहेत. केंद्रात व राज्यात भाजप व मित्र पक्षाचे सरकार सत्तेत आहे. बांधकाम कामगारांसाठी जे जे करता येईल ते प्रामाणिकपणे हा हाजी अरफत शेख नक्कीच करेल व त्यांच्या अडचणी मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ असे मत कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हाजी अरफात शेख यांनी व्यक्त केले.

ते इस्लामपूर शहरातील यल्लामा चौक नजिक असलेल्या बुरूड गल्ली, विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे रयत क्रांती कामगार संघटनेच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना लागणाऱ्या साहित्यांच्या पेटी वाटप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी रयत क्रांती कामगार संघटनेचे संघटक श्री. जितेंद्र सुर्यवंशी बोलताना म्हणाले कि, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री मा. श्री. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात संघटित व असंघटित कामगार यांच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सतत कार्यरत रहात आहोत. रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष, युवा नेते मा. श्री. सागरभाऊ खोत यांच्या आदेशानुसार संघटनेत कार्यकर्ते व पदाधिकारी हे काम करत आहेत आदरणीय सदाभाऊ खोत यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहात आहोत.

यावेळी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हाजी अरफात शेख यांचा सत्कार रयत क्रांती संघटनेच्या वतीने श्री. जितेंद्र सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते शाल, फेटा श्रीफळ व बुके देवून करण्यात आला.

यावेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्षा मा. सौ. श्रद्धाताई शिंदे, रयत क्रांती संघटना इस्लामपूर शहर अध्यक्ष श्री. सर्फराज डाके, रयत क्रांती संघटना अल्पसंख्याक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. मोहसीन पटवेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

समारंभास रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. सागर सदाभाऊ खोत, नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे श्री.देवेंद्र उपाध्याय, श्री. उमर मेमन , श्री. दिनेश गोसावी, सांगली जिल्हाध्यक्ष श्री.अतुलबाबा शिंदे, आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व कामगार वर्ग, महिला – पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून व पुढाकाराने कामगारांना आवश्यक असलेल्या साहित्यांचा संच पेठी उपलब्ध करून दिल्याने उपस्थित सर्वांच्या मध्ये आनंद व समाधानाचे वातावरण दिसत होते. प्रमुख पाहुणे यांचे समारंभ ठिकाणी आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

स्वागत व प्रास्ताविक श्री. अक्षय नागे यांनी केले. तर उत्तम व शानदार कार्यक्रमाचे संयोजन श्री. बापूसाहेब सूर्यवंशी, श्री. आकाश कोरडे, श्री. सागर तेवरे यांनी केले. शेवटी आभार महेश वडे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!