ताज्या घडामोडी

खालगाव प्रभागातील मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांचे शिष्यवृत्ती विषयक विशेष मार्गदर्शन

Spread the love

जाकादेवी /वार्ताहर :-
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव बीट मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशीप परीक्षेविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्याचा उपक्रम रत्नागिरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी हाती घेतला आहे.
जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा विषयक उपस्थित सर्व मुख्याध्यापक व लिपीक यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तरवळ व ओरी केंद्राचे केंद्रीय प्रमुख प्रकाश कळंबटे,आगरनरळ केंद्राचे राजीव दर्डी, धामणसे केंद्राचे श्री. केळकर,जाकादेवी प्रशालेचे पर्यवेक्षक भूपाल शेंडगे,कलाध्यापक तुकाराम दरवजकर, संतोष पवार यांच्यासह खालगाव बीट मधील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचावण्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात सराव परीक्षांवर अधिक भर दिला असून सदर सराव परीक्षेचे नियोजनही मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. यावेळी प्रेरणा शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा, पाठ्यक्रम, प्रश्नपत्रिका सराव, योग्य मार्गदर्शन, सातत्य, आत्मविश्वास याबाबत मुख्याध्यापकांचे उद्बोधन केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते यांनी प्रशासकीय कामकाजाची अभ्यासपूर्ण माहिती देऊन मुख्याध्यापकांच्या प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जाकादेवी विद्यालयाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पर्यवेक्षक भूपाल शेंडगे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख, उपस्थित मुख्याध्यापक,जाकादेवी विद्यालयाचा स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.स्वागत केंद्रीय प्रमुख प्रकाश कळंबटे यांनी, प्रास्ताविक श्री.केळकर तर सूत्रसंचालन राजीव दर्डी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!