ताज्या घडामोडी

सागावच्या उपसरपंच पदी सौ.वंदना दीपक पाटील यांची निवड

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सागाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या पाच सदस्यांनी विरोधी राष्ट्रवादी गटाच्या व विशेष करून माजी मंत्री शिवाजीराव नाईक गटाच्या सौ. वंदना दीपक पाटील यांना आपल्या गटात सामील करून आपल्या विचारांची उपसरपंच करण्यात यश मिळवले.
आज सागाव गावचे उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच सौ अस्मिता रवि पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी राष्ट्रवादी व भाजपाकडून सौ. कीर्ती सागर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. राष्ट्रवादीचे सात सदस्य भाजप पुरस्कृत एक सदस्य एकत्र आलेने व काँग्रेस पुरस्कृत पाच सदस्य असलेने सौ.कीर्ती गायकवाड या उपसरपंच होतील असे मानले जात होते.
काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने ऐन मोक्याच्या वेळी विरोधी राष्ट्रवादी गटाच्या पॅनल मधील सौ वंदना दीपक पाटील यांना आपल्याकडे वळवल्यानंतर काँग्रेसचे सदस्य पदाचे बलाबल सहा झाले. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी विद्यमान सरपंचांनी आपल्या मताचा अधिकार गाजवल्यानंतर ही बेरीज सात – सात अशी समसमान झाली.शासन निर्णयानुसार उपसरपंच पदासाठी समसमान मते झाल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने सरपंच सौ. अस्मिता रवि पाटील यांनी सौ वंदना दीपक पाटील यांच्या पारड्यात आपले मत टाकून त्यांना उपसरपंच म्हणून घोषित केले.
उपसरपंच निवडीचे सेनापत्य माजी उपसरपंच श्री शशिकांत पाटील व नूतन सदस्य दिलीप पाटील यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. यावेळी ॲड.रवि पाटील, निवृत्त बँक निरीक्षक आर बी पाटील, श्री संजय शेटे, श्री मोहन पाटील,श्री दगडू पाटील आदी प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी नूतन सरपंच उपसरपंच व नूतन सदस्यांचा सत्कार करून निवडणूक निर्णय अधिकारी सौ.सविता पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री आर डी पाटील, यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!