ताज्या घडामोडी

महिला याच समाज व्यवस्थेचा कणखर कणा आहेत.” – रवि वसंत सोनार

Spread the love

सोनार दांपत्यांकडून सुरक्षा रक्षक महिलांचा आर्मी कमांडोच्या हस्ते सन्मान…!

पंढरपूर (प्रतिनिधी /वार्ताहर /वृत्तसेवा) :- “ जगभरात महिला याच समाज व्यवस्थेचा सक्षम आणि कणखर कणा आहेत.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने आयोजित येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक महिलांचा सन्मान कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले – “माणसाच्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक वळणावर स्त्री ही एक महत्त्वाची भूमिका निभावत असते. आई, मावशी, आत्या, मामी, काकू, बहीण, मैत्रीण, पत्नी या व इतर भूमिका निभावताना समाजातील प्रत्येक स्त्री ही अतिशय जबाबदारीने कर्तव्य पार पाडत असते.”
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मा. बालाजी पुदलवाड, मा. शकुंतलाताई नडगिरे, डॉ. सचिन लादे, सौ. अंजली लादे, सौ. सविता रवि सोनार, कु. रेवती सोनार, कवी सचिन कुलकर्णी, हुसेनभाई मुलाणी, कबीर देवकुळे, दिपक नाईकनवरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आर्मी कमांडो विक्रम नाईकनवरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक महिलांचा महावस्त्र, गृहोपयोगी भेटवस्तू, गुलाबपुष्प, पाककला तसेच सौंदर्यकला पुस्तक संच स्नेहभेट देऊन सन्मान करण्यात आला. कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या माध्यमातून सन्मान व गौरव करण्यात आल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक महिलांना तसेच परिसरातील नागरिकांतून विशेष आनंद व्यक्त होत आहे. कार्यकम यशस्वी करण्यासाठी कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!