ताज्या घडामोडी

शिराळा पश्र्चिम भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा

Spread the love

बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांची मागणी
कोकरुड/ प्रतिनिधी
शिराळा पश्चिम भागामध्ये ऊसाच्या शेतात लपून बसलेले बिबटे येथिल परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्या,मेंढ्या, कोंबड्या, वस्तीवरील कुत्र्यांवर वारंवार हल्ले करीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच शासनाकडून मिळणारी अल्प प्रमाणात नुकसान भरपाई लवकर मिळत नाही. वनविभागाला येथिल शेतकरी बिबट्याचा बंदोबस्त करावा.अशी मागणी वारंवार करत आहेत.परंतु वनविभागा याकडे गांभीर्याने पहात नाही.तरी याबाबत आपण वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न करुन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत . तसेच शेती साठी दिवसा वीज मिळावी असे आशयाचे निवेदन बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष बाबासो कदम यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!