आपला जिल्हाक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर ११ वाजता अंत्यसंस्कार होणार.

Spread the love

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर ११ वाजता अंत्यसंस्कार होणार.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ मे.

तळेगाव दाभाडे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांची अंत्ययात्रा आज (दि. १२ मे) रोजी स्वप्ननगरी, तळेगाव दाभाडे स्टेशन येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्यावर रात्री ११ वाजता बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज दुपारी पावणेदोन च्या सुमारास नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. गोळीबार करत डोक्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले किशोर आवारे यांना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी वायसीएम हॉस्पिटल पिंपरी-चिंचवड येथे पाठविण्यात आले.
किशोर आवारे यांच्यावरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पवना हॉस्पिटल परिसरात गर्दी केली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात आणि दुःखाचे सावट पसरले असून तळेगाव दाभाडे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला. तळेगाव शहरात चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तळेगाव शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या अज्ञात मारेकऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून तपासासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!