सोनवडे व नेर्ले लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी घेतली आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट
शिराळा प्रतिनिधी : सोनवडे (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी सौ. सोनाली युवराज नाईक व सदस्य सर्जेराव पाटील, पांडुरंग बाबर, दिप्ती नाईक, गणपती पवार, नलिनी कांबळे, संगीता राणे, रविंद्र खंडागळे, मनिषा कुंभार व मंदाताई पाटील यांचे अभिनंदन करून सत्कार केला. गावचा कारभार आदर्शवत करावा. विकासात सर्व सदस्यांनी व सरंपंचानी चांगले योगदान द्यावे. लोकांच्या हिताची व सार्वजनिक विकासाची कामे करावी, अशा शुभेच्छा आमदार मानसिंगभाऊ यांनी दिल्या. या वेळी शामराव नाईक, रवि पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, पोपट मोहिते, युवराज नाईक, आनंदा व लक्ष्मण कंदारे, बाजीराव पवार, मोहन नाईक, आनंदा पाटील, बाजीराव व अक्षय नांगरे, निलेश कळंत्रे, विठ्ठल राणे, मधुकर, विठ्ठल, तुकाराम व आनंदा खोत, आनंदा मस्कर, माजी सरपंच सुवर्णा सुतार आदी उपस्थित होते.
: नेर्ले (ता. वाळवा) : येथील ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेले सदस्य शुभंम पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष पाटील, संभाजी पाटील, तानाजी पाटील, वैभव पाटील, नेताजी पाटील, संग्रामसिंह पाटील, अक्षय, सचिन, प्रवीण, गौरव, मानसिंग, शैलेश, मयुर, बजरंग, प्रवीण, मधुकर, रविंद्र व आकाश पाटील उपस्थित होते.