क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटद विभाग पुरस्कृत आणि फायटर ११ संघ जांभारी आयोजित प्रिमियर लीग चषकाचा मानकरी ठरला जय भैरी जांभारी संघ.

Spread the love

रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा परिसरातील खेळाडूंना क्रिकेटचा आनंद व क्रिकेट खेळाच कौशल्य दाखवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटद विभाग पुरस्कृत आणि फायटर ११ संघ जांभारी आयोजित २० वर्षाखालील खेळाडूंसाठी जांभारी प्रिमियर लीग चषकासाठी भव्य स्वरुपाची ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत वाटद परिसरातील एकुण १८ संघानी सहभाग घेऊन सदर स्पर्धा हि जांभारी फाटा येथील मैदानावर घेण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जय भैरी जांभारी आणि जय हनुमान कुंडली अशी अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये जय भैरी जांभारी संघ विजयी होऊन प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. तर उपविजेता संघ जय हनुमान कुडली ठरला. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी आठघराणेचा राजा क्रिकेट संघ कांबळे लावगण पात्र ठरला.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाटद विभाग उपतालुका अध्यक्ष श्री. किरणदादा बैकर, मनसे वाटद विभाग अध्यक्ष श्री. सत्यविजय खाडे साहेब तसेच उपविभाग अध्यक्ष श्री. संदिप बलेकर आणि श्री. किशोर कुलये उपस्थित होते.
सदर स्पर्धा ही मनसे उपविभाग अध्यक्ष श्री. किशोर कुलये यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली असून याच नियोजन कु. शनेश पागडे, शुभम चौगुले, तन्मय जाधव, नितेश डाफळे या महाराष्ट्र सैनिकांनी केल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाटद विभाग अध्यक्ष श्री. सत्यविजय खाडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सर्व संघ प्रतिनिधी आणि खेळाडू तसेच सर्व क्रिकेट प्रेमींचे आभार व्यक्त करुन फायटर ११ संघाच्या नियोजनाच खुप खुप कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!