महाराष्ट्र

इंनरव्हील क्लब तळेगांव दाभाडेचा पदग्रहण समारंभ संपन्न

Spread the love

तळेगांव: इंनरव्हील क्लब तळेगांव दाभाडेचा पदग्रहण समारंभ सुशीला मंगल कार्यालय येथे शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.

यावेळी नूतन अध्यक्षा काजल  गारोळे यांनी मावळत्या अध्यक्षा  प्रवीण साठे यांच्या कडून पदाची सूत्रे स्वीकारली. उपाध्यक्षपदी वैशाली दाभाडे तर सचिवपदी  संध्या थोरात यांनी सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून इंनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन  संतोष सिंग या उपस्थित होत्या.

काजल गारोळे ह्या विज्ञान शाखेत पदवीधर असून तळेगांवच्या सूर्या बेकरीच्या संचालिका आहेत. करोना महामरित गरीब जनते पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा  संकल्प नूतन अध्यक्षा  काजल गारोळे यांनी सोडला आहे.
कोविड-19 चे सर्व शासकीय नियम पाळून, सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. तळेगांव मधील अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!