ताज्या घडामोडी

मालगुंड ब.प.विद्यालयाला प्रसिद्ध उद्योजक विनायक केळकर यांच्याकडून लॅपटॉपची देणगी

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजसाठी मालगुंड येथील ज्येष्ठ उद्योजक विनायक सदाशिव केळकर यांनी आपली मातोश्री कै.उमाबाई सदाशिव केळकर यांच्या स्मरणार्थ सुमारे ४० हजार किमतीचा उत्तम दर्जाचा लॅपटॉप मालगुंड प्रशालेला देणगी रूपाने भेट दिला.
प्रसिद्ध उद्योजक,शिक्षणप्रेमी विनायक सदाशिव केळकर व केळकर कुटुंबीय यांनी लॅपटॉपची वाढती गरज, शैक्षणिक,अध्यापनात व कार्यालयीन क्षेत्रातील महत्त्व लक्षात घेऊन मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजसाठी उत्तम दर्जाचा लॅपटॉप भेट रूपाने दिला.सदरचा लॅपटॉप मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान व उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, संस्थेचे सचिव व शालेय प्रशासनाचे अभ्यासक विनायक राऊत, मुख्याध्यापक नामदेव वाघमारे
पर्यवेक्षक नितीन मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.
या उदात्त देणगीबद्दल मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, संस्थेचे सचिव विनायक राऊत, विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक नामदेव वाघमारे ,पर्यवेक्षक नितीन मोरे यांनी उद्योगपती विनायक केळकर व केळकर कुटुंबिय यांचे शाळा व शिक्षण संस्थेतर्फे आभार व्यक्त केले.यावेळी अशोक केळकर,चेतन केळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना हा लॅपटॉप लाभदायक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!