ताज्या घडामोडी

बालाजी नलवडे यांना गुणवंत कामगार पुरस्कार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा नगरीचे सुपुत्र श्री. बालाजी किसन नलवडे यांना महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला.
श्री. बालाजी नलवडे हे किर्लोस्कर ब्रदर्स लि.किर्लोस्करवाडी येथे गेली 26 वर्ष रिप्लिकास्ट फाॅड्री मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत च्या सेवेमध्ये जपलेला प्रामाणिक पणा सचोटी व अविरत केलेल्या कष्टाचे हे बक्षीस त्यांना मिळाले आहे. त्यांचा हा पुरस्कार किर्लोस्कर कंपनी व त्यांच्या सहकार्यां साठी अभिमानास्पद आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे शिराळा येथील नलवडे परिवार व मित्रांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!