ताज्या घडामोडी

बहुजनांच्या लग्नात मध्यस्थांना नाकारले तरच अंधश्रद्धा कर्मकांड कमी होईल-सत्यशोधक रघुनाथ ढोक

Spread the love

फुले एज्युकेशन तर्फे नाशिकला 30 वा सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

नाशिक- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे उच्चशिक्षित सत्यशोधिका कल्याणी रमेश खैरनार BE. Entc, वठार, नाशिक आणि सत्यशोधक दिग्विजय पोपटराव जाधव ,BE.Civil, MBA नाशिक यांचा ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले 191 व्या जयंतीनिमित्त दि.4 जानेवारी 2022 रोजी दु.12 वाजता धनदाई बास्केट हॉल,रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न झाला.
यावेळी ओबीसी सेल काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समाजसेवक विजय राऊत,नगरसेवक प्रियांका व धनंजय माने,अनंता सुर्यवंशी, जेष्ठ नागरी संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम तांबेमामा ,शिवराम पवार,पत्रकार योगेश कमोद, व सत्यशोधक चळवळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की बहुजनांच्या मनात विशिष्ट जातीने लग्न लावले तरच लग्न होते. ही भीती काढण्यासाठी आजच्या काळात या मध्यस्थाना नाकारले तरच बहुजन व इतर समाज अंधश्रद्धा कर्मकांड यातून बाहेर पडेल.यासाठी महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात 150 वर्षांपूर्वी सर्व विधीची माहिती दिली आहे. सत्यशोधक विवाह व इतर विधी कोणताही स्त्री पुरुष पार पाडू शकतत यासाठी मध्यस्थाची गरज नाही असे देखील ढोक म्हणाले.
समाजसेवक विजय राऊत आणि योगेश कमोद म्हणाले की सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पुण्यावरून येऊन नाशिक मध्ये आज हा 3 रा सत्यशोधक विवाह मोफत लावला त्यांद्दल त्यांचे आभार मानून ढोक व धाडगे सर यांचा विशेष सन्मान केला.
हा 30 वा सत्यशोधक विवाह संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्याचा अखंड गात वधु वर यांचे कडुन सर्वांचे साक्षीने जीवनसाथी म्हणून नीट संसार करीत महापुरुषांचे विचाराने समाजसेवा करू असे अभिवचन घेतले.
तर  महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन व भारतीय उद्देशिका प्रा.सुदाम धाडगे यांनी सर्वांकडून वधवून घेतली.
वधु वर यांनी सभामंडपात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय हातात धरून फुलांच्या पायघाड्या वरून आगमन करीत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास व छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून घोषणा देत अभिवादन केले .
या पसंगी नवदाम्पत्यांना विजय राऊत ,अध्यक्ष रघुनाथ ढोक ,प्रथमेश जाधव यांचे शुभहस्ते रजिस्टर नोंदणी करून सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम भेट दिली.तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आई वडील,मामा मामी,हॉल चे मालक धर्मेंद्र खैरे यांना सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान केला.यावेळी कोव्हिडं चे सर्व नियम पाळत ,अक्षता म्हणून सुगंधी फुलांच्या पाकळ्या वापरून धान्याची नासाडी करू नये हा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!