ताज्या घडामोडी

समाज माध्यमावर भाजपा नेते सत्यजित देशमुख यांचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :
मंगळवारी झालेल्या जगप्रसिद्ध नागपंचमीच्या मिरवणुकीत भाजपाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित भाऊ देशमुख यांनी या उत्सवातील झालेल्या मिरवणुकीत सहभागी होऊन एका नाग मंडळातील डॉल्बीवर ठेका धरीत कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून तीन वेळा शड्डू मारल्याचा व्हिडिओ शिराळा तालुक्यात समाज माध्यमावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी धरलेले ठेक्यावर व त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मारलेल्या शड्डूची संपूर्ण तालुका वर चर्चा होत आहे.
तीन वर्षांच्या खंडानंतर शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी नागपंचमी मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरी झाली या नागपंचमीच्या उत्सवात सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याप्रमाणे भाजप नेते सत्यजित भाऊ देखील या मिरवणुकीच्या जल्लोषात सहभागी झाले होते. या मिरवणुकीत एका नाग मंडळातील कार्यकर्त्यांच्या आग्रहासत्व डॉल्बीच्या संगीतावर भाऊ यांनी ठेका धरला आहे हे पाहून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले.त्यावेळी त्यांनी खांद्यावर बसून तिनवेळा शाड्डू मारला यामुळे उपस्थित युवकामधे मोठा उत्साह संचारला. या विडीओची क्लीप समाज माध्यमातून तूफान वायरल होत आहे.त्याची खुमासदार चर्चा आज बुधवारी तालुक्यात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!