अध्यात्मिकऐतिहासिकमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरात जकात, फित्रा, खैरात करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी..

घरोघरी मुस्लिम महिलांनी नजाम पठण करून ईद साजरी केली.

Spread the love

पिंपरी चिंचवड शहरात जकात, फित्रा, खैरात करून मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी..In the city of Pimpri Chinchwad, Muslim brothers celebrated Ramadan Eid with enthusiasm by paying Zakat, Fitra, Khairat.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी २२एप्रिल.

जकात, फित्रा, खैरात करून पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरा केली. ईदगाह मैदान, मस्जिद, मदरसामध्ये नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

घरोघरी मुस्लिम महिलांनी नजाम पठण करून ईद साजरी केली. ईदगाह मैदान येथे चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. विविध भागात स्थानिक राजकीय सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची भेट घेवून ईद निमित्त पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

रमजान महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलेही व सल्लम याचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधवांनी रोजा (उपवास) महिनाभर केला, या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुरआन पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली.
आज ईदची नमाज पठणापूर्वी श्रीमंत, सधन आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे अडीच किलो धान्य किंवा तेवढी रक्कम आर्थिक परिस्थिती कमकुवत असणा-या गरीब कुटूंबांना दान म्हणून देण्यात आले. जेणेकरून गरीबातील गरीबालासुद्धा ईद साजरी करता यावी. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज पिंपरी-चिंचवड शहरात आज ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

भल्या सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद व मदरसाकडे वळाली, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना धर्मगुरूंनी नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

चिंचवडगाव येथील इदगाह मैदानावर व आलमगीर शाहिद येथे मोठ्यासंख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत म्हणाले, आपण स्वतः, कुटुंब व समाज सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष ठेवा, पोलीस सदैव आपल्या बरोबर आहे व राहिल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. येथील अध्यक्ष गाजीम बसरी, इम्रान पानसरे, इक्बाल मुलाणी आदींनी संयोजन केले. माजी महापौर आझम पानसरे यांना अनेक मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या रमजान महिन्यामध्ये शुक्रवारची व रमजान सणाच्या वेळेला जशी नमाज पठण करता, तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावे. ज्या चुका केलेल्या आहेत. त्याची क्षमा अल्लाहजवळ मागा, सत्याची कास अंगिकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडीलांनी करावे, असे आवाहन करून रमजान सणाची माहिती विषद केली. चिंचवड स्टेशन येथे गौसीया जामा मस्जिदमध्ये अध्यक्ष झिशान सय्यद, युसूफ खान, समीर शेख, हबीब शेख आदींनी संयोजन केले. आकुर्डी येथील अक्सा मस्जिदमध्ये अध्यक्ष शाकीर शेख, शकिल खान, एजाज शेख यांनी संयोजन केले. मदिना मस्जिदमध्ये तसेच, सुन्नी मस्जिदमध्ये अध्यक्ष अमजद शेख यांनी नमाज पठण केले.

पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणच्या मस्जिद, मदरसे, ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांची व्यवस्था विविध ठिकाणी तेथील ट्रस्टीच्या वतीने करण्यात आली. त्यात निगडी येथील नुरानी मजीदमध्ये अध्यक्ष रशिद शेख, जुहूर खान, लियाकत शेख, मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले., आकुर्डीत मदिना मजीद, अक्सा मजीद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातीमा मजीद, नुरूल इस्लाम मजीद, कस्तूरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मजीदमध्ये नमाज पढविण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील दवा बाझार येथील समा-ए-दिन-ए आदब मजीदमध्ये नमाज पठण झाले. काळाखडक वाकड येथे गौसीया जामीया मस्जिदमध्ये अध्यक्ष समीर खान, युसूफ खान, जमीयतूल कुरेश, पिंपरी मस्जिदमध्ये अध्यक्ष युसूफ कुरेशी, शेहबाज कुरेशी. सुबानीया जामा मस्जिद, काळेवाडी येथे जुम्मादीन मुलाणी, शौकत मुलाणी, ईस्माईल शेख. गुलशन ए मदिना मस्जिदमध्ये अध्यक्ष शौकत मुल्ला, एजाज पटेल. जमातीया लतिफीया जामा मस्जिदमध्ये अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, हाजीअकबर मुल्ला, फकीर मुलानी, मुस्ताक शेख. नेहरूनगर येथील तवक्लल्ला जामा मस्जिदचे अध्यक्ष नजीर तरजगार, हाजी रशीद पिरजादे, आयातुल्ला सय्यद. दापोडी गावठाण येथे जामा मस्जिदचे अध्यक्ष कुरशीद सय्यद, आरिफ शेख, फिरोज शेख. भोसरी गावठाणमध्ये अंजूमन शैफूल इस्लाम जामा मस्जिदचे अध्यक्ष करीम सय्यद, सरदार शेख, अब्दुल अहमद, राजू मुलानी. लांडेवाडी येथे मदरसा असरफीया मदरसाचे अध्यक्ष तौफीक खान, हाजी गयासुद्दीन खान, हाजी अब्रारअली. कुदळवाडी येथे रजा जामा मस्जिदचे अध्यक्ष नियाज सिद्धीकी. नुराणी मस्जिदमध्ये अध्यक्ष नजीउल्ला खान, सोहराब शहा, हाजी जउल्ला सिद्धीकी. मदिना जामा मस्जिदमध्ये अध्यक्ष जुम्मन खान, मकबुल खान. अशरफीया मस्जिदमध्ये अध्यक्ष याकुब खान, नियाज सिद्धीकी. पवारवस्ती चिखली येथे नुरी मस्जिदमध्ये जमीर उल्ला चौधरी, शाही मस्जिदमध्ये अध्यक्ष फिरोज शेख, ईसाख शेख. चर्‍होली गावठाण येथे अहेले सुन्नत वल जमात मुलाणी मस्जिदमध्ये अध्यक्ष सिराज हाजी गुलाम मुलाणी, वसीम मुलाणी, अकबर मुलाणी. कासारवाडी येथील अंजुमने गुलशने मदिना मस्जिदचे अध्यक्ष लियाकत कुरेशी अकबर शेख, दस्तगीर तांबोळी.पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात असलेल्या कब्रस्तानच्या ठिकाणी रमजान ईदच्या नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जावून त्यांना आदरांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!