ताज्या घडामोडी

ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शिराळा शहरात प्रथमच सामूहीक राष्ट्रगीत गायन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / 15 ऑगस्ट 2022 रोजी संपुर्ण भारत देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे या महोत्सवाला अनुसरून हे वर्ष अधिकाधिक अविस्मरणीय व्हावे व ते तसेच रहावे यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन युध्द पातळीवर करण्यात येत आहे याच महोत्सवाचा अविभाज्य भाग असणा-या घरोघरी तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून देशाप्रती अपार प्रेम, निष्ठा व भारतीय असल्याचा सार्थ अभियान व्यक्त करण्याच्या हेतूने तसेच घरोघरी तिरंगा अभियान शहरातील आबालवृध्दापर्यंत पोहचविणेसाठी शिराळा नगरपंचायतने प्रथमच नागरिकांच्या उस्फुर्त सहभागात सामूहीक राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमाचे आयोजन दिनांक 09/08/2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता शहरातील प्रमुख वर्दळीचा भाग असलेल्या सोमवार पेठेतील पोटे चौक येथे केले. या कार्यक्रमासाठी सकाळी 10.30 वाजलेपासून ध्वनीक्षेपकाद्वारे शहरातील मध्यवर्ती असलेल्या अत्योच्च इमारतीवरून पुर्व कल्पना देत शहरातील इतर भागातील नागरिकांना पोटे चौक येथे राष्ट्रगीत गायनासाठी उपस्थित राहणेबाबत नगरपंचायतमार्फत आवाहन करणेत आले. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने या सामूहीक राष्ट्रगीत गायन सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. ज्या नागरिकांना व व्यावसायिकांना या ठिकाणी उपस्थित राहणे असंभव होते अश्या नागरिकांनी उभे असलेल्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीताचे गायन करून या उपक्रमात आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास मा.उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, मा.तहसिलदार गणेश शिंदे, मा.गटविकास अधिकारी संतोष राऊत, मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच इतर विभागाचे व नगरपंचायतीचे सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच शहरातील पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!