ताज्या घडामोडी

उसाचा धंदा अतिशय शाश्वत होणार त्याच्या पाठीमागे कारखाने व बॅका पाहिजेत ; माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा उसाचा धंदा हा आणखी दोन वर्षांनी अतिशय शाश्वत धंदा होणार आहे. इथेनॉलचा वापर असाच वाढत गेल्यास केवळ उस व इथेनॉलवर देश उभा राहील असे अर्थशास्त्र आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या सगळ्यांच्या मागे कारखाने आणि बँका सक्षमपणे उभ्या रहिल्या पाहिजेत असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.
शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी घोरपेडे म्हणाले, बँकेने सहा टक्केची वन टाइम सेटलमेंट योजना राबविल्याने शेतकरी व सोसायट्या बाहेर निघतील व बँक वाचेल. बँक एन.पी.ए.च्या काठावर आली होती. या पुढील काळात बँक जपणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणारा माणुस म्हणून मानसिंगराव नाईक अध्यक्ष झाल्याने आम्हाला मोठा आधार आहे. त्यामुळे मानसिंगराव तुम्ही कोणाच्या ही दबावाला बळी पडू नका.आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे मुद्दाम सांगतोय बिधकपणे काळ्याला काळं आणि पांढऱ्याला पांढरं म्हणा. सर्व संचालक तुमच्या पाठीशी असतीलच पण हा अजितरावांचा आवाज तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. कवठेमहांकाळ तालुक्याचा झालेला विकास हा शिराळच्या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे झाला आहे. या पाण्यामुळे बेडग ते ढालगाव पर्यंत ७० हजार एकर द्राक्ष बागायत झाहे, ही केवळ शिराळच्या पाण्यामुळेच.
मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळ्यात बँकेची चांगली वस्तू उभी रहावी ही शेतकऱ्यांची मागणी होती. थकबाकीदार यांना बँकेने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. बँक ८२ टक्के पीक कर्ज देते.त्याचा फायदा बँकेस होत नसला तरी हा तोटा शेतकऱ्यांच्यासाठी सहन केला जात आहे. या बँकेने शेतकरी हिताचे कायम निर्णय घेतले आहेत.
यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, संचालक अनिता सगरे, विशाल पाटील , बाळासाहेब होनमारे, मन्सूर खतीब, प्रकाश जमदाडे,सुरेश पाटील, चिमन डांगे, वैभव शिंदे, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडीक, महेंद्र लाड,तानाजी पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी एस.पी.वाघ, संपतराव देशमुख ,रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक,विराज नाईक, भूषण नाईक,पृथ्वीसिंह नाईक, सहायक निबंधक डी.एस.खताळ,यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार सत्यजित देशमुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!