ताज्या घडामोडी

सफाळे आय टी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीचा दिक्षांत समारंभ संपन्न

Spread the love

प्रमोद पाटील,
पालघर जिल्हा प्रतिनिधी :
राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत सफाळेतील कोकण एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट संचालित, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सफाळे संस्थेच्या उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारंभ नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ सफाळ्याचे लायन पंकज म्हात्रे, आय टी आय सफाळे चे प्राचार्य नितीन वर्तक तसेच शिक्षक वर्ग आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सदर आय टी आय मधून २८ व्या बॅचमधून उत्तीर्ण झालेल्या एकूण ५५ उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीना प्रमाण पत्र वितरीत करून गौरवण्यात आले.त्यातील प्रत्येक व्यवसायाच्या प्रशिक्षणात प्रथम ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षार्थीना प्रमाणपत्राबरोबरच भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी बरोबरच पालकही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!